तरूणांनी महापुषांचे विचार अंगीकारावे - मेटे महाराज.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आज देशातील तरूण मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेला बळी पडत आहेत. त्याचे कारण म्हणजे योग्य मार्गदर्शन व बेरोजगारी आहे. परंतु स्वतःमधील कौशल्य ओळखल्यास बेरोजगारीवर मात करुन स्वतःचे विश्व निर्माण करता येते. हे अनुभवण्यासाठी महापुषांचे विचार अंगीकारावे असे मत परिवर्तनवादी युवा विचारवंत ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी मत व्यक्त केले.


अहमदनगर येथील एनबीएनच्या कार्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी पञकार अशोक झोटींग युवा प्रबोधनकार हभप सिध्दीनाथ मेटे महाराज एन बीएन चे संचालक करण गारदे, प्रशांत , लोकसत्ता संघर्षचे प्रकाश साळवे , साई फोटोचे अविनाश पठारे व ईतर मान्यवर उपस्थित होते .

पुढे बोलताना ते म्हणाले की आपण अनेक महापुरूषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजर्‍या करतो परंतु हे करत असतांना आपण त्यांच्या विचातून काय प्रेरणा घेतो हेही महत्वाचे आहे. या महापुरूषांनी लोकमानसात जे विचार मांडले , जे तत्वज्ञान मांडले ते केवळ एक दिवसापुरते न राहता कायमस्वरुपी आचारणात आणावे . लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कमी शिकले पण त्यांनी उच्चतम लिखान करून समाज्यात परिवर्तन घडवुन आणण्याचा प्रयत्न केला. 

सर्वात महत्वाचे म्हणजे कामगारांचे प्रश्न आपल्या शैलीत संपुर्ण जगासमोर मांडले.आज तरूणांनी या महामानवाच्या चारिञ्यातुन खुप काही घ्याने सारखे आहे. जातविरहीत समाजरचना, स्वाःततील मुल्य ओळखुन वाटचाल करत, लढाऊ बाणा, प्रतिकुल परिस्तितीवर मातकरणे, असे खुप काही महामानवांच्या अभ्यासातुन शिकता येते असे ते म्हणाले.
या प्रसंगी पञकार अशोक झोटींग म्हणाले की प्रसिध्दी माध्यमे नेहमीच समाज्यातील महामानवांचे विचार मांडत आलेले आहेत. त्यामुळे समाज्यात खुप मोठे परिवर्तन घडले असुन या साठी सर्व प्रसिध्दी माध्यमांचे योगदान मोलाचे व अभिनंदनीय आहे. कार्यक्रमाचे सुञसंचालन करण गारदे यांनी केले तर आभार प्रशांत यांनी मांडले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.