शिवसेनेवर युवकांचा मोठा भरोसा - उपनेते अनिल राठोड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेना ही सर्वसामान्यांची संघटना आहे; त्यामुळे शिवसेनेला मानणारा सर्वसामान्य वर्ग आहे. नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच शिवसैनिक हे तत्पर असतात. त्यामुळे आज ज्या पदाधिकार्‍यांची निवड झाली आहे, त्यांनी त्यांच्या पदाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्‍न सोडवावेत. सेनेमध्ये राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व आहे. तुमच्याकडे येणार्‍या नागरिकांचे प्रश्‍न सुटले पाहिजे, त्यास प्राधान्यता द्या. यासाठी संघटन महत्वाचे आहे. शिवसैनिकांनी वाघासारखे वागले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेेते अनिल राठोड यांनी केले. 


शिवसेनच्यावतीने उपशहरप्रमुख, विभागप्रमुख व वाहतुक सेनेच्या पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्रे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते देण्यात आली. याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, सभागृहनेते अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सचिन जाधव, संभाजी कदम, संजय शेंडगे, गणेश कवडे, अनिल बोरुडे, सतीश मैड, दत्ता मुदगल, अशोक दहिफळे, पारुनाथ ढोकळे, संजय आव्हाड आदि उपस्थित होते. 

शिवसेनेवर युवकांचा मोठा भरोसा ...
पुढे बोलताना उपनेते राठोड म्हणाले, शिवसेनेत येणार्‍यांची संख्या वाढत आहे. कारण शिवसेनेवर युवकांचा मोठा भरोसा आहे. कारण शिवसेनेतच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यात येतो. गुंडगिरी, दादागिरी असला प्रकार शिवसेनेत होत नाही. सत्तेशिवाय प्रश्‍न सोडविण्याची ताकद फक्त शिवसेनेत असल्याने सर्वसामान्यांनाही शिवसेना ही आपलीशी वाटते. 

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम शिवसेनेने केले.
याप्रसंगी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, आज माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला शिवसेनेचे महापौर केले, हे फक्त शिवसेनाच करु शकते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम शिवसेनेने केले. नियुक्त झालेल्या पदाधिकार्‍यांनी सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. मनपाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण सर्वोतोपरि सहकार्य केले जाईल, असेही त्या म्हणाल्या. 

पदांच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे प्रश्‍न सोडवावेत.
याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, सध्या युवक शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे पदे देण्यात येत आहेत. पदांच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे प्रश्‍न सोडवावेत. प्रत्येक पदाधिकार्‍यांने नियोजनपूर्वक अभ्यास करुन ते सोडवावेत. वरिष्ठ पदाधिकारी आपणास सर्वोतोपरि मदत करतील. 

नियुक्त झालेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे : उपशहरप्रमुख - वैभव सुरवसे, शहर कोके, अरुण धामणे, प्रशांत गायकवाड, अनिल लेंडकर, वसंत शिंदे, पन्नालाल लसगरे, दिपक सागडे, विठ्ठल जाधव, डॉ.राजेंद्र आल्हाट. विभागप्रमुख - गोविंद कुलकर्णी, राहुल शिंदे, सुरेश कटारिया, गणेश धारक, मंगेश फुलसौंदर, तुळशीदास फुलसौंदर. वाहतुक सेना : उपशहर प्रमुख - सलिम शेख, विभागप्रमुख - शिवाजी उबाळे, एमआयडीसी विभाग- संजय कदम, भिंगार - शेख अब्दुल गनीबाबू, सावेडी - ज्ञानेश्‍वर दातरंगे. कायदेशीर सल्लागार - अ‍ॅड.विकास सांगळे, निमंत्रण प्रमुख - दिलीप गलांडे, कैलास पाचपुते, सचिन भिंगार दिवे आदिंच्या नियुक्ती करुन पत्र देण्यात आले. 

यावेळी भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, संभाजी कदम, गणेश कवडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार अनिल बोरुडे यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.