नगर शहरातील बेकायदेशीर रुग्णालये रडारवर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील महापालिका हद्दीत रुग्णालये व छोट्या दवाखान्यांची अनधिकृत बांधकामे पुन्हा ऐरणीवर आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात केलेल्या कारवाईचा अहवाल महापालिकेला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावर दहा आगस्टला सुनावणी होईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी दिली आहे. 

नगर शहरातील रुग्णालयांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात २०१५ रोजी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायाधीश एस. सी. धर्माधिकारी, मंगेश पाटील यांच्यापुढे २६ जुलैला सुनावणी झाली.

ॲड. मुकुल कुलकर्णी यांनी याचिकाकर्ते शेख यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली. ॲड. एस. बी. यावलकर यांनी राज्य सरकारतर्फे बाजू मांडली. महापालिकातर्फे ॲड. व्ही. एस. बेद्रे यांनी बाजू मांडली. महापालिका अशा बांधकामाच्या विरोधात कारवाई करणार आहे, असे त्यावेळी महापालिकेतर्फे सांगण्यात आले होते.

न्यायालयाने त्याची दखल घेत महापालिकेने १८ जुलै २०१६ दाखल केलेले शपथपत्र अमान्य करत नाराजी व्यक्त केली. महापालिका कार्यक्षेत्रातील ३३४ दवाखाने व १५० रुग्णालये आहेत. त्यातील ३३४ दवाखान्यांपैकी ४३ दवाखान्यांनीच ना हरकत दाखले घेतले आहेत. १५० रुग्णालयांपैकी फक्त आठ रुग्णालयांनी ना हरकत मिळविले आहेत. यातील फक्त दोन रुग्णालयांनी बांधकाम पूर्णत्वचा दाखला मिळविला आहे. 

शहरातील इतर दवाखाने आणि रुग्णालयांनी नियमांचे पालन केलेले नाही. यांच्याविरोधात कारवाईची पूर्तता करून त्याचा अहवाल दहा ऑगस्टला सादर करण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे ॲक्शन टेकन अहवाल मागितला आहे, अशी माहिती शाकीर शेख यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.