भाजपने शिवसेनेला पाडले खिंडार नालेगाव व केडगावातील युवकांचा पक्ष प्रवेश.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील नालेगाव मधील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते शिवाजी अनभुले व केडगावमधील शिवसेनेचे २५ वर्षापासून काम करणारे युवा कार्यकर्ते प्रतिक बारसे यांनी आज युवकांसह केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. 


या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी, जेष्ठ नेते सुनील रामदासी, उपमहापौर श्रीपाद छिंदम, सरचिटणीस किशोर बोरा उपस्थित होते. शिवाजी अनभुले व प्रतिक बारसे यांच्या समवेत युवकांनी पक्षामध्ये प्रवेश केला. रामदासी यांनी पक्षाचे पंचे घालून स्वागत केले.

केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, पक्षामध्ये युवकांना संधी आहे. देशात सर्वत्र भाजपची ताकद वाढत आहे. युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या शेकडो लाभादाई योजना आपापल्या भागातील सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचवाव्यात. तसेच आपापल्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे देखील ते म्हणाले. 

प्रतिक बारसे व शिवाजी अनभुले यांनी आपापाल्या भागातून मोठे शक्ती प्रदर्शन करून दुचाकी रॅली काढली. गटनेते सुवेंद्र गांधी, नगरसेवक मनोज दुल्लाम, महेश तावले, मध्यनगर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, चेतन जग्गी, भय्या गंधे, नितीन शेलार, श्रीकांत छिंदम, अभय लुणिया, प्रशांत मुथा, तुषार पोटे उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.