सहारा फाऊंडेशन ट्रस्ट व राम-रहीम युनिटीच्या वतीने चाँदबेबी महालावर वृक्षरोपण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आंतराष्ट्रीय युवा दिना निमित्त सहारा फाऊंडेशन ट्रस्ट व राम-रहीम युनिटीच्या वतीने ऐतिहासिक चाँदबेबी महालाच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. 


यावेळी आजीम राजे, मेजर रफिक शेख, फिरोज आर्किटेक, वाहिद शेख, अज्जू शेख, समीर खान, सरफराज कुरेशी, लतिफ खान, नजीर पठाण, शरीफ सय्यद, आरिफ शेख, शब्बीर शेख, अरफात शेख, शोएब काझी आदि उपस्थित होते.

आजीम राजे म्हणाले की, उजाड डोंगर व माळरान हिरवळीने फुलल्यास पर्यावरणाचा समतोल साधला जाणार आहे. वृक्षरोपणासाठी युवकांनी पुढाकार घेतला असून, या मोहिमेने चळवळीचे रुप धारण केले आहे. 

वाढते शहरीकरण व औद्योगीकरणाने पर्यावरणाचे प्रश्‍न निर्माण झाले असून, वृक्षरोपण व संवर्धन ही काळाची गरज बनल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. युवकांनी एकत्र येवून चालू केलेले सामाजिक कार्य व राबविण्यात आलेल्या वृक्षरोपण मोहिमेचे मेजर रफिक शेख यांनी कौतुक केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.