खेळाडूचा जीवनात कधीही पराभव होत नसतो -अभिषेक कळमकर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :खेळाडूचा जीवनात कधीही पराभव होत नसतो. खेळाडूवृत्तीने जीवनात आलेल्या विविध संकटांशी सामना करण्याचे बळ मिळते. यश, अपयश हे नाण्याच्या दोन बाजू असून, यशाने आत्मविश्‍वास बळावतो. तर अपयशाने पुन्हा प्रयत्न करण्याची जिद्द निर्माण होत असल्याची भावना माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी व्यक्त करुन, विद्यार्थी दशेत क्रिकेट खेळताना चांगले मैदान उपलब्ध झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 


अहमदनगर जिल्हा कराटे असोसिएशन व आयडियल ग्रुपच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी माजी महापौर अभिषेक कळमकर यांची निवड झाली असता त्यांचा सावेडी येथील आनंद विद्यालयात सत्कार करण्यात आला. खेळाडूंशी संवाद साधताना ते बोलत होते.

याप्रसंगी नगरसेवक निखील वारे, डॉ.प्रितम भुजबळ, मुख्य प्रशिक्षक घनश्याम सानप, अमोल काजळे, जगदीश देशमुख, शिव घेगडे, प्रशांत पालवे, वैभव आव्हाड, अतुल काजळे, धर्मनाथ घोरपडे, विद्यासागर क्लासचे प्रसाद सामलेटी, अक्षय चौधरी, शुभम जोशी, स्नेहल तळेकर, युगांशी गवळी आदिंसह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे अभिषेक कळमकर म्हणाले की, सध्या विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी सुविधा प्राप्त झाले असून, त्यांना खेळात नैपुण्य दाखविण्यास वाव आहे. तसेच कराटे या खेळाला इंडियन ऑलंम्पिकची मान्यता मिळाली असून, या खेळाडूंना 5 टक्के आरक्षण मिळणार आहे. तसेच सरकारी नोकरीसाठी प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पाहुण्यांचे स्वागत आमोल काजळे यांनी केले. प्रास्ताविकात घनश्याम सानप यांनी विविध स्तरावर खेळाडूंनी मिळवलेल्या प्राविण्याचा आढावा घेतला. नगरसेवक निखील वारे म्हणाले की, कोपर्डी प्रकरणानंतर मुख्य प्रशिक्षक घनश्याम सानप यांनी जिल्ह्यातील मुलींसाठी कराटे प्रशिक्षणाचे धडे देवून, त्यांचे मनोधैर्य वाढविले. तसेच त्यांना दुष्टप्रवृत्तीशी सामना करण्याचे बळ दिले. अनेक विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून घडले आहे. तर अनेक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.