15 ऑगस्टला भाजपच्या वतीने तिरंगा रॅली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहर मध्यवर्ती असल्याने येथे शिक्षण घेण्यासाठी आजूबाजूच्या तालुक्‍यांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे येतात. नवीन ठिकाणी आल्यानंतर त्यांना अनेक समस्या भेडसावतात. अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर असतात. ओळखी नसल्याने अडचणीत भरच पडत जाते. अशाप्रसंगी जर कोणी मदतीचा हात दिला तर त्यांच्यासाठी पुढील वाटचाल सुकर होण्यास मदत होते. हा हात देण्याचे काम भाजपा विद्यार्थी आघाडी करीत आहे. 


विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करून ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्‍न प्राधान्यक्रमाने सोडवावेत. 15 ऑगस्टला नगर शहरातून तिरंगा रॅली काढण्यात येणार असून, यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे. यानिमित्त शहरात 15 भाजपा शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मनपा गटनेते सुवेंद्र गांधी यांनी केले.

भाजपा विद्यार्थी आघाडीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी बाळकृष्ण आव्हाड यांना नियुक्‍तीचे पत्र मनपा गटनेते सुवेंद्र गांधी यांच्या हस्ते देण्यात आले; यावेळी गांधी बोलत होते. याप्रसंगी युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष नितीन शेलार, बंटी डापसे, तुषार पोटे, पप्पू गर्जे, अभिजित बोडखे, शिवाजी पालवे, राजेंद्र गिते, किरण लटपटे, दीपक गुंजाळ, आशिष पाटोळे, संकेत डोळे, अंकुश वाघमारे, विशाल आव्हाड, गणेश आव्हाड, सुमंत खेडकर, अभिषेक आव्हाड, अभिजित बुधवंत, धर्मनाथ आव्हाड, आदी उपस्थित होते.

नितीन शेलार म्हणाले की, भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून शहरात युवकांचे संघटन केले जात आहे. युवकांच्या माध्यमातून समाजातील प्रश्‍न सोडविले जात आहेत. केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांना व युवकांना अनेक चांगल्या योजना राबविल्या आहेत, अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची अधिक सक्षमपणे अंमलबजावणी होण्यासाठी मोर्चाचे पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.