नागरीक आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातूनच विकास होवू शकतो - महापौर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सावेडी परिसर हा शहरातील विकसनशिल असा भाग आहे. या भागातील सुसंस्कृत व जागरुक नागरिकांमुळे परिसाराच्या विकासात भर पडत आहेत. नागरीक आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून आपल्या भागाचा विकास होवू शकतो; हे येथे होत असलेल्या विकास कामातून दिसून येत आहे. आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरवा केला पाहिजे. येथील आवश्यक त्या गोष्टींची आणि समस्यांच्या जाणिव करुन दिली पाहिजे. आणि लोकप्रतिनिधींनीही त्या सोडविल्या पाहिजे तर आपला भागाचा परिपूर्ण विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले. 


प्रभाग क्र.8 वरद विनायक कॉलनी येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नगरसेविका उषा नलावडे, नगरसेविका सुनिता मुदगल, संपत नलावडे, शशांक महाले, रावसाहेब पवार,विजय दिकोंडा,दिनेश राऊत,कुंदन परदेशी,अंबादास त्रिंबके, पवार, चिलवर, तिरमल आदि उपस्थित होते. 

पुढे बोलतांना महापौर कदम म्हणाल्या, आपल्या प्रभागाच्या नगरसेविका उषाताई नलावडे या प्रभागाच्या विकासबाबत नेहमीच विविध कामांसाठी पाठपुरवा करत असतात. त्यांच्या नियोजनपूर्वक कार्यातून प्रभागातील विविध विकास कामे मार्गी लागली आहेत. नागरिकांनीही त्यात आपला सहभाग देऊन आपल्या भागाचा विकास करावा, असे आवाहन महापौर कदम यांनी केले. 

यावेळी बोलताना नगरसेविका उषा नलावडे म्हणाल्या, प्रभागात लोकवस्ती वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक भागात जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याचा आपला प्रयत्न असतो. नागरिकांनी पाठपुरवा केल्यास त्या ठिकाणी आपण ताबोडतोब आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देत आहोत. 

मुलभूत विकास कामांना आपले प्राधान्य असून, पुढील काळात प्रभागातील ठिकठिकणच्या मोकळ्या जागेत जॉगींग पार्क, ग्रीन जीम व लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी नगरसेविका सुनिता मुदगल, रावसाहेब पवार आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत नलावडे यांनी केेले तर आभार शशांक महाले यांनी मानले. कार्यक्रमास परिसारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.