आंतराष्ट्रीय युवा दिनानिमित्त बस स्थानकाची स्वच्छता.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :युवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती असून, परिवर्तनाची क्रांती युवकांमुळे घडणार आहे. सामाजिक कार्यात युवकांच्या पुढाकाराची गरज आहे. युवकांनी उच्च ध्येय ठेवून, सत्येच्या मार्गानी चालल्यास निश्‍चित यश मिळणार असल्याची भावना परिवहन महामंडळाचे तारकपूर आगारप्रमुख अविनाश कल्हापुरे यांनी व्यक्त केली.


आंतराष्ट्रीय युवा दिना निमित्त जय मल्हार शैक्षणिक व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नेहरु युवा केंद्राच्या ग्रामस्वच्छता पंधरवाड्यातंर्गत स्वास्तिक चौक येथील तीन नंबर बस स्थानकावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी कल्हापुरे बोलत होते.

याप्रसंगी जय मल्हार संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, सचिव निलम जाडकर, जय युवा अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड.महेश शिंदे, अस्मिता युवा विचारमंचच्या अस्मिता जावळे, अजय जाडकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, माळीवाडा बस स्थानकचे प्रमुख शिवाजी कांबळे, तीन नंबर बस स्थानकचे प्रमुख अमोल सोमवंशी, रयत प्रतिष्ठाणचे पोपट बनकर, नेहरु युवा केंद्राचे तालुका समन्वयक अक्षय चौधरी, मनिषा खरात, मयूर पटेल, राजेंद्र बसापुरे, रोहीदास गाढवे, स्वाती बनकर, जयश्री शिंदे, रेखा नगरे, दिनेश शिंदे, प्रा.सुनिल मतकर आदि उपस्थित होते.

प्रास्ताविकात निलम जाडकर यांनी स्वच्छता अभियानात महिलांनी योगदान दिल्यास स्वच्छ भारत अभियान खर्‍या अर्थाने यशस्वी होणार असल्याचे सांगून, स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. कांतीलाल जाडकर यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. भ्रष्टाचार मुक्त, स्वच्छ भारत व दहशतवाद व जातीवाद मुक्त भारत घडविण्यासाठी युवकांना प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. 

हातात झाडू घेवून, बस स्थानकावर उतरलेल्या युवकांनी परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत उपस्थित पाहुण्यांसह प्रवाश्यांनी देखील सहभाग नोंदवला. अ‍ॅड.महेश शिंदे यांनी सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, रोगराईला आळा घालण्यासाठी स्वच्छता आवश्यक असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजय जाडकर यांनी केले. उपस्थितांचे आभार मुकेश दुधाडे यांनी मानले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांचे मार्गदर्शन लाभले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.