नगर शहरात 24 तास पाणी देण्याचा संकल्प - महापौर सुरेखा कदम.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगरसेवक संजय शेंडगे व अनिल बोरुडे यांच्या प्रयत्नांमुळे प्रभाग 13 व 25 चा विकास होऊ शकला. शिवसेनेने 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण केल्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे. शहरातील नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, शहराला भविष्यकाळात 24 तास पाणी देण्याचा आमचा संकल्प आहे. यासाठी अमृत योजना मंजूर झाली आहे. फेज-2 चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही काम बाकी असून यातील अडथळे दूर करून ते पूर्ण केले जातील, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.

शिवसेनेचे गटनेते संजय शेंडगे यांच्या प्रयत्नांतून व महापौर सुरेखा कदम यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग 25 व 13 मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला; यावेळी महापौर कदम बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेवक अनिल बोरुडे, महिला- बालकल्याणच्या सभापती सारिका भूतकर, अनिल लेंडकर, डॉ. अनिरुद्ध गिते, प्रकाश जोगदे, सचिन निसळ, शांतीलाल गांधी, प्रा. अरुण पानसरे, शकुंतला गांधी, बबन फलके, नारायण इवळे, सबाजी काकडे, अविनाश भांडारकर, कैलास भडके, आश्‍लेषा भांडारकर, डॉ. मनीषा पुंड, लता तुम्मनपेल्ली, स्नेहलता बंड, रेश्‍मा पुप्पाल, लता पानसरे, मुक्ता फलके, महावीर कांकरिया, यदुनाथ जोशी, सागर मुळे, चेतन हजारे, सोमनाथ कोकणे, आदी उपस्थित होते.

प्रभाग 25 च्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रभाग 25 हा कल्याण रोड परिसर, बालिकाश्रम रस्ता परिसर, वारुळाचा मारुती परिसर, दातरंगेमळा भाग आहे. या भागातील अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. उर्वरित प्रश्‍नही लवकरच मार्गी लावणार आहोत. कल्याण रोड परिसरात नव्याने लोकवस्ती वाढते आहे. या परिसरातील ड्रेनेजलाइन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न व रस्त्यांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन दरबारी निधीसाठी प्रयत्न चालू आहे, असे संजय शेंडगे यांनी सांगितले.

प्रभाग 13 मध्ये नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न सोडवून पूर्ण झाले आहेत. प्रभागामधील ओपन स्पेसच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच प्रभाग 13 हा समस्यामुक्त होण्यास मदत झाली आहे. बालिकाश्रम रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळेच या परिसराच्या विकासाला चालना मिळाल्याचे अनिल बोरुडे यांनी सांगितले.

विकासकामात नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. मनपाची परिस्थिती नाजूक असतानाही महापौर व नगरसेवक आपल्या परीने शहरात चांगले काम करीत आहेत, असे अनिरुद्ध गिते यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.