मुस्लिम समाजातील युवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुस्लिम व दलित समाजातील नागरिकांवर वारंवार होणारे हल्ले व प्रशासनाकडून आरोपींवर ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले. 


यावेळी मोबीन शेख, अफजल सय्यद, मतीन सय्यद, नईम सरदार, शहेबाज बॉक्सर, शहा फैसल, जाकीर हुसेन, रियाज इंजीनिअर, डॉ.जुनेद शेख, युसूफ वेल्डर, जफर शेख, फैसल शेख, समीर फर्निचरवाला, कामरान अहेमद आदिंसह विविध मुस्लिम स्वयंसेवी संघटनेचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धार्मिक मुद्दा उपस्थित करुन, मुस्लिम व दलित समाजातील नागरिकांवर वारंवार हल्ले होत आहे. या हल्ल्याद्वारे समाजात जातीय तेढ निर्माण करुन, वातावरण दुषीत केले जात आहे. जातीयवादी व धर्मांधशक्ती कायदा हातात घेवून, स्वत:च न्यायधीशाची भूमीका बजावून शिक्षेची अंमलबजावणी करत आहे. या प्रकरणात प्रशासन मात्र बघ्याची भुमिका पार पाडत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

लवकरच गणेशोत्सव व बकरी ईद हे दोन सण एकत्र येत असून, समाजविघातक प्रवृत्ती पुन्हा आपले डोके वर काढण्याची शक्यता आहे. बकरी ईद निमित्त शहरी व ग्रामीण भागात अधिकृत कत्तलखाने उपलब्ध करुन दिल्यास, कसल्याही संशयाला वाव राहणार नाही. देशात गोवंश हत्याच्या संशयाने तर इतर भावनिक मुद्दा उपस्थित करुन मुस्लिम समाजावर हल्ले केले जात आहे. या घटनेत अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, या घटनेचा संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय समिती मार्फत व्हावा. कायदा हातात घेवून निरपराध लोकांवर हल्ले करणार्‍यांना पाठिशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व यामागील मुख्यसुत्रधारांचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांना देण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.