कोठी ते यश पॅलेस रस्त्यावरचे पथदिवे असून बंद; भाजपचा पाठपुरावा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दोन वर्षांपासून पाठपुरावा करून कोठी ते यश पॅलेस रस्त्यावरील पथदिवे सुरू होता, होता राहिले. स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे हे सुरू असलेले काम बंद पडल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वकील आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल रासकर आणि विद्यार्थी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष सुरज पुंड यांनी केला आहे. 

कोठी ते यश पॅलेस हा रस्ता नेहमीच वर्दळीचा आहे. दोन ते तीन वर्षापूर्वी या रस्त्याचे काम सुरू होते. आता रस्ता चांगला आणि मजबूत झाला आहे. दुतर्फा पथदिवे देखील आहेत. पण, ते बंद आहेत. ते सुरू करण्यासाठी राऊ प्रतिष्ठानमार्फत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. प्रशासनाने त्याची दखल घेत काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर पथदिवे काही काळ सुरू झाले. पण, पुन्हा काही कारणास्तव बंद पडले. यानंतर या पथदिव्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

महापालिकेने याची दखल घेत कार्यवाहीचे आश्वासन दिले. अतिरीक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून पथदिवे चालू करण्यासाठी सूचना केल्या. यानंतर सुरू झालेले पथदिवे पुन्हा बंद पडले. या प्रकाराची दखल घेत राऊ प्रतिष्ठानतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्याची दखल महापालिका प्रशासनाने तातडीने कर्मचाऱ्यांना पाठवून पथदिवे सुरू करण्यात आले. पण तिथे राजकीय हस्तक्षेप झाल्याने कर्मचारी पथदिवे सुरू न करताच मागे फिरले, असा आरोप ॲड. रासकर यांनी केला आहे.

पथदिवे असून देखील पुन्हा बंद झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. या रस्त्यावर दुतर्फा मोठी बाजारपेठ आहे. मार्केटयार्ड परिसर असल्याने शेतकरी येथे उशिरापर्यंत थांबतो. व्यवहार करतो. काही ठिकाणी सहकारी पतसंस्था आहे. इ्स्टिटट्यूट व हॉस्पिटल आहेत. विद्यार्थ्यांची व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपामुळे बंद झालेले पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी ॲड. रासकर व पुंड यांनी निवेदनाद्वारे महापालिकेकडे केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.