लोकप्रतिनिधींकडून शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचे धोरण - माजी मंत्री पाचपुते.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विसापूर तलावात कुकडीचे आवर्तन येऊन 15 दिवस उलटले तरीही विसापूर कॅनॉल ला पाणी का सुटले नाही. हा उशीर कोणामुळे झाला आहे. फक्‍त श्रेयासाठी शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचे धोरण लोकप्रतिनिधींनी घेतले आहे, असा आरोप माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केला.

पाचपुते म्हणाले, ज्यावेळी घोडच्या शेतकऱ्यांना पाण्याची आवश्‍यकता होती त्यावेळी प्रशासनाने आडमुठे धोरण घेतले होते. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी घोड धरणावर आंदोलन केलेपण काहींनी याला राजकीय स्टंटचे स्वरूप देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. जनतेच्या हितासाठी मी आयुष्यभर काम करत आलो आहे.

फक्‍त राजकारण डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे भासवित नाही. जनतेला अडचणीत मदत करण्याचे सोडणार नाही आणि कोणाच्या टीकेला उत्तर देण्यातही आता वेळ घालवणार नाही.

घोडच्या पाण्याबाबत आंदोलन केलेत्यावेळी माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात आले. पण ज्यांनी घोडबाबत माझ्यावर चुकीचे आरोप केले आहेत ते विसापूरच्या पाण्याबाबत गप्प का बसून आहेत. कुकडीच्या आवर्तनाबाबत मंत्रीस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला म्हणूनच 18 जुलैला आवर्तन सुटले. कुकडीचे आवर्तन सुटून 15 दिवस झाले. या दिवसांत विसापूरमध्ये पाणी आले पण हे पाणी विसापूर कॅनॉलला सोडण्यात कोणामुळे उशीर झाला आहे हे टीका करणाऱ्यांनी जनतेला सांगावे.

विसापूरमध्ये 15 दिवस पाणी राखून ठेवण्यामागचा नेमका कोणता हेतू होता हे त्यांनी सांगावे, असे आव्हानही पाचपुते यांनी आमदार राहुल जगताप यांना दिले. शुक्रवारी कुकडीचे कार्यकारी अभियंता कोळी यांना विसापूरच्या शेतकऱ्यांसह आवर्तनाबाबत भेटलो. विसापूर ची बैठक घेण्याची सूचना केली. त्यानुसार रविवारी बैठक झाली पण बैठकीला स्वतः अध्यक्ष असणारे गैरहजर का राहिले. या बैठकीत आवर्तन सोडण्याबाबत ठरले असताना पुन्हा उशीर का केला जात आहे, असा सवाल पाचपुते यांनी केला.

विसापूरच्या आवर्तनाबाबत जर आम्ही लक्ष घातले असते तर पुन्हा आम्ही पाण्यात अडचणी निर्माण करतोय असा आरोप करायला मोकळे झाले असते म्हणून आम्ही स्वतः विसापूरच्या बैठकीला हजर राहिलो नाही. पण ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी शेतकऱ्यांना उशिरा पाणी सोडून कोणता फायदा केला आहे हे जाहीर सांगावे, असेही पाचपुते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.