कर्जमाफी सुविधा केंद्रा मार्फत रोटरी व प्रशासनाचा शेतकऱ्यांना मदतीचा हात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतकरी कर्जमाफी संदर्भात शासनाची भूमिका पारदर्शी आहे.ही योजना राबवितांना खेड्या पाड्यात काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे.मात्र कुणीही या योजनेपासून वंचित राहू नये याची प्रशासन काळजी घेईल.अकोले रोटरी क्लबने सुविधा केंद्र सुरू करून या योजनेच्या अंमल बजावणी साठी जाणवणारी स्वयंसंस्थेची अडचण दूर केली आहे.प्रशासना प्रमाणे रोटरीचीही भूमिका कुणीही या योजने पासून वंचित राहू नये अशीच असल्याचे प्रतिपादन संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले.

रोटरी क्लब अकोलेच्या वतीने काल गुरुवारी "शेतकरी कर्जमाफी अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देणाऱ्या केंद्राचा शुभारंभ येथील विकास सोसायटी सभागृहात प्रांताधिकारी डोईफोडे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी डोईफोडे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले हे होते.

यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे,रोटरी क्लब चे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, पतितपावन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ,ज्येष्ठ विचारवंत प्रा.एस.झेड.देशमुख,शेतकरी संघटनांची सुकाणू समितीचे राज्य निमंत्रक डॉ.अजित नवले,अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व अगस्ती कारखान्याचे संचालक मच्छिन्द्र धुमाळ, उद्योजक सुरेश गडाख,महेश नवले, माजी सरपंच संदीप शेटे, माजी संचालक भाऊसाहेब खरात,ऍड.आनंदराव नवले,अकोले विकास सोसायटीच्या अध्यक्षा सौ.अनिता धुमाळ,उपाध्यक्ष भास्कर नवले, खंडू वाकचौरे,रोहिदास धुमाळ,रमेश नाईकवाडी,रघुनाथ शेणकर,निवृत्ती झोळेकर, नगरसेवक परशुराम शेळके, विकास देशमुख,बाळासाहेब पानसरे,राधाकिसन धुमाळ,यादवराव नाईकवाडी,धोंडिभाऊ शेटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना प्रांताधिकारी डोईफोडे यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना सुरू केली.याबाबत संगमनेर तालुक्यात सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.या योजनेत गावागावातील शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील असे सांगतानाच रोटरी क्लब सामाजिक व विधायक क्षेत्रात करत असलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली.

अध्यक्षीय भाषणात मधुकरराव नवले यांनी तालुक्यातील विविध सहकारी संस्थांनी आपल्या कडे उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सुविधांचा लाभ या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना मिळून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणत्याही आंदोलनाची यशस्वीता लोकांच्या सहभागावर अवलंबून असते .राजकारण हे सामाजिक सेवा देण्याचे एक प्रभावी साधन आहे.शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी पोट तिडकीने शेतकऱ्यांच्या प्रश्नी होणाऱ्या लढयात उतरले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. रोटरी क्लब च्या उपक्रमांचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
प्रा.एस झेड देशमुख यांनी सहकारी संस्थांना प्रशिक्षण देण्याचे काम रोटरी क्लब च्या माध्यमातून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ.अजित नवले यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी चळवळीचा रेटा वाढविण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.शेतकऱ्याच्या आयुष्यात चार सुखाचे दिवस यावे यासाठी सर्वांनीच यापुढेही प्रयत्न करण्याची गरज आहे.रस्त्यावरील संघर्ष, वैयक्तिक संघर्ष व रोटरी क्लब चा विधायक उपक्रम असे सर्व जण एक परिवार म्हणून या संघर्षात पुढे जाऊ यात असेही ते म्हणाले.
मच्छिन्द्र धुमाळ यांनी रोटरी क्लब ने शेतकऱ्यांसाठी हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करतांना विकास सोसायटीने सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफी अर्ज भरून देणेसाठी मदत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

आधार केंद्राचे संचालक कुंदन कोरडे यांनी योजनेबाबत उपस्थितांना माहिती दिली. प्रास्ताविक व स्वागतात अमोल वैद्य यांनी सरकारी योजना भरपूर आहेत पण त्या सर्व सामान्यां पर्यंत पोहचत नाहीत ,त्याचा अपेक्षित लाभ मिळत नाही , शेतकऱ्यांच्या आक्रमक लढयामुळे शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली मात्र त्यात शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी भेडसावत आहेत.योजना जनतेपर्यंत पोहचली तरच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे .रोटरी क्लब चा हाच प्रामाणिक प्रयत्न असलंयाचे त्यांनी सांगितले.या योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.सूत्रसंचालन रो.दीपक महाराज देशमुख यांनी केले तर आभार कामगार तलाठी रो.बाबासाहेब दातखिळे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेक्रेटरी सचिन आवारी, खजिनदार सचिन देशमुख,उपाध्यक्ष तुषार सुरपुरीया, वकील बाळासाहेब वैद्य, ,सचिन शेटे, विक्रम नवले,दत्तात्रय वाळुंज, वकील अमोल धुमाळ,प्राचार्य विद्याचंद्र सातपुते,मयूर रासने,सुधीर फरगडे,डॉ.सुरींदर वावळे, ,डॉ.संतोष तिकांडे, डॉ रवींद्र डावरे,श्रीकांत नाईकवाडी, सुधीर गडाख, सी.ए.असिफ शेख,हेमंत मोरे,अरुण सावंत, नामदेव पिचड,यश चोथवे, प्रवीण झोळेकर,रोहित गायकवाड,रविंद्र वाकचौरे,श्रीकांत वाकचौरे,संदेश धुमाळ , अमोल देशमुख,,डॉ.जयसिंग कानवडे ,आदींनी विशेष परिश्रम घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.