डॉ.सुजय विखेंच्या रुपात पांडुरंग मदतीला धावला !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जाच्या आर्थिक चक्रव्युहात अडकल्यानंतर पुनर्गठणाच्या अडथळ्यांची शर्यत पार करणारा डॉ. तनपुरे साखर कारखाना पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आला, गेली साडेतीन वर्ष कारखान्याच्या गेट व धुराड्याकडे आशाळनभूत नजर असलेल्या डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या ३०० हून अधिक कायम कामगारांनी कार्यस्थळावरील श्री लक्ष्मीनारायणाची पूजा केली. आणि सकाळी लक्ष्मीनारायणाच्या पूजेनंतर ‘पुंडलिका वरदे, हरीविठ्ठल’च्या जयघोषात कारखान्यात प्रवेश केला. 


तब्बल साडेतीन वर्षानंतर कारखान्याचे चाक फिरणार असल्याची आशा निर्माण झाल्याने कारखान्याच्या आवारात पाऊल ठेवताना कामगारांना आनंद झाला होता. डॉ. सुजय विखे यांच्या रूपाने कामगारांना ‘पांडुरंग’ भेटल्याची प्रतिक्रिया एका कामगाराने दिली.

जिल्हा बँकेने कर्जाचे पुनर्गठण करून कारखाना संचालक मंडळाकडे सुपूर्त केल्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कायम कामगारांना दि.1 ऑगस्टपासून कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले  होते .

एकेकाळी सुबत्ता असणार्या डॉ. तनपुरे कारखान्याच्या कामगारांचा भलताच रूबाब होता. मात्र, जसजशी कारखान्याची परिस्थिती ढासळत गेली, तसतशी कामगारांचीही अवस्था बिकट झाली. ३६ महिन्यांचे पगार थकल्यानंतर सन २०१३-१४  चा गळीत हंगाम कसाबसा पार पडल्यावर कारखान्याचे चाक पूर्णपणे थांबले होते .

५४ महिन्यांचे पगार थकल्यानंतर कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. पगार तर नाहीच, विमा, भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेबाबत साशंकता निर्माण झाली. त्यामुळे कामगारांचे भविष्य अंधकारमय होऊन बसले. त्या-त्या काळात सत्ताधारी राहिलेल्या पुढार्यांच्या काही बगलबच्च्या कामगारांनी मात्र, आपले उखळ पांढरे करून घेतले. 

राजकीय हेवेदावे आणि एकमेकांना विरोधामुळे राहुरी तालुक्यातील काही दिवसांपासून थांबलेली सहकार चळवळ व तालुक्याचा विकास पुन्हा एकदा सुस्थितीत येईल, अशीच अपेक्षा सर्व सभासद, कामगार, शेतकरी व सामान्यांची आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.