थकीत पगारासाठी श्रीरामपूर नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर नगरपरिषेदेच्या ठेकेदाराने 4 महिन्यापासून कंत्राटी कामगाराचे वेतन थकविल्याने व वारंवार नगरपालिका व ठेकेदार यांच्याकडे थकीत वेतनाची मागणी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने कंत्राटी कामगारांनी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे सरचिटणीस कॉ.जीवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर तब्बल 5 तास ठिय्या आंदोलन केले.मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी उद्या चारही थकीत पगार करण्याचे मान्य केल्यानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.


यावेळी बोलताना कॉ.जीवन सुरुडे यांनी सांगितले की,नगरपालिकेने मे.मॅक्रो इकॉनॉमिकल एनव्हायरोमेन्ट सोल्युशन प्रा.लि. नाशिक यांना ठेका दिलेला आहे.ठेकेदाराने नगरपालिकेशी झालेल्या करारानुसार कोणत्याही अटी शर्थीचे पालन केलेले नाही. सरकारने निर्धारित केलेले किमान वेतन, कर्मचारी विमा इ.बाबीचा सातत्याने ठेकेदाराने भंग केलेला आहे. दि.२४ फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्र शासनाने सफाई कामगाराचे किमान वेतन सुधारित केलेले आहे,त्याचीही अमलबजावणी नगरपालिकेकडून करण्यात येत नाही. 

 याबाबत गेल्या 2 वर्षापासून नगरपालिकेकडे लेखी तक्रारी करूनही त्यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे प्रयत्न केले आहे. वास्तविक मुख्य मालक म्हणून नगरपालिकेने करारानुसार किमान वेतन,pf यासर्व विविध बाबीची अमलबजावणी करणे आवश्यक आहे.ठेकेदार नियमाप्रमाने वागत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा, व त्याला काळ्या यादीत टाकण्याचा पूर्ण अधिकार मुख्याधिकाऱ्यांना असतानाही ते जाणीवपूर्वक कारवाइ करण्यास टाळाटाळ करत आहे.

तसेंच नगरपालिकेतील सत्ताधारी ही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे त्यामुळे ठेकेदारांची अरेरावी वाढलेली असून कामगाराची पिळवणूक करण्याचे काम ठेकेदारांने सुरू केले असल्याचा आरोप कॉ.सुरुडे यांनी केला.यावेळी सदर आंदोलांत कॉ.श्रीकृष्ण बडाख,कॉ.मदिना शेख, कॉ. लखन डांगे आदींसह मोट्या संख्येने कामगार उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.