कोशियारी समितीपेक्षा जास्त पेन्शनवाढ पेन्शनधारकांना देणार - ना.बंडारू दत्तात्रय.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना श्रीरामपूरचे पाहिले देशव्यापी अधिवेशन,साई पालखी निवारा,शिर्डी कोपरगाव रोड शिर्डी येथे नुकतेच पार पडले त्यावेळी केंद्रीय कामगार मंत्री ना.बंडारू दत्तात्रय यांनी पेन्शनधारकांना खा.कोशियारी समितीपेक्षा जास्त पेन्शन वाढ देण्याचा केंद्र सरकार निश्चित प्रयत्न करीन असे प्रतिपादन केले.


पेन्शनवाढ,कोशियारी कमिटी शिफारशी लागू करा,आरोग्य सुविधा मिळाव्यात,अन्नसुरक्षा कायदा लागू करावा,इपीएस ९५ पेन्शनधारकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागते.इपीएस ९५ साठी आपले स्वतःचे लाखो रुपये ठेव कायम सरकारकडे जमा होत आहे.

त्यातून अल्पशी रु १०००/-ते १५००/-पेन्शन मिळते.त्यासाठी २२ वर्षात अनेक आंदोलने केली पण सरकार गांभीर्याने दखल घेत नाही.या संघटनेचे कार्य २०१२ पासून सुरु आहे.राज्यात विविध संघटना या विषयी कार्यरत आहेत.दरमहा रु ६५००/- पेन्शन व महागाई भत्तासह मिळावी,खा.कोशियारी समिती शिफारशीची अंमलबजावणी करावी.सेवानिवृत्तांना दर्जेदार आरोग्यसुविधा,व वार्षिक उत्पन्न रु ३००००/-चे आत असल्याने अन्नसुरक्षा योजना लागू करावी,वय ६० असलेल्या जेष्ठ कामगारांना प्रवास सवलत राज्य शासनाने लागू करावी,१९९५ च्या कायद्यात व सूत्रात बदल करावा,अन्य कारणाने उद्योग,धंदा बंद झाल्यास अथवा वयाच्या ५८ पूर्वी निवृत्ती घेतलेल्या सर्वाना पूर्ण पेन्शन द्यावी.दि २४-७- २००९ नंतर निवृत्त झालेल्या कामगारांना दोन वर्षाचे वेटेज मिळावे.व त्यांना रिटर्न ऑफ कॅपीटलचा लाभ,फरक द्यावा.बदलीनंतर अकौंट क्र.तोच ठेवावा.इ. मागण्याचे निवेदन माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे खा दिलीप गांधी,यांच्या समवेत सुभाष कुलकर्णी,सुभाष पोखरकर,आनंदराव वायकर,गोरख कापसे,एस एल दहिफळे आदींनी दिले.

अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय कामगार मंत्री ना.बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते दिपप्रज्वलाने झाले.साई संस्थान विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे हे अध्यक्षस्थानी होते. प्रास्तविक सुभाष कुलकर्णी, मनोगत व समस्या बाबत मा.खा.भाऊसाहेब वाकचौरे, खा.दिलीप गांधी,गोरख कापसे, सुभाष पोखरकर, एस एल दहिफळे, आनंदराव वायकर,रमेश गवळी, ज्ञानदेव आहेर, व देशातील पदाधिका-यांनी व्यक्त केले.देशातील सर्व संघटनांना एकत्र आणल्याने लढ्याला मोठे यश मिळाले,स्व.बबनराव पवार यांचे नंतर कार्य पुढे नेण्याचे काम सुभाष कुलकर्णी यांनी केले.या पहिल्या देशव्यापी अधिवेशनास राज्यातील,जिल्ह्यातील,देशातील १५००० आसपास पेन्शनधारक उपस्थित होते.त्यामुळे पेन्शनधारकांच्या आशा उंचावल्या. 

अध्यक्ष गोरख कापसे,सरचिटणीस सुभाष कुलकर्णी,कार्याध्यक्ष एस एल दहिफळे,सुभाष पोखरकर,उपाध्यक्ष ज्ञानदेव आहेर,बाबासाहेब गाडे,,जयराम उफाडे,राजेंद्र होनमाने,अशोक पवार,चेडे,गफूर दुर्गुडे,भागीनाथ काळे,प्रकाश कुटे,बाळासाहेब चव्हाण,नारायण होन,अशोक पाटील,वर्पे,सुधाकर चव्हाण,लाळे,राजेश शिरसाठ,म.रा.सर्व श्रमिक महासंघ चिटणीस आनंदराव वायकर,बी एल कदम,रमेश गवळी,शरद नेहे,विष्णुपंत टकले,शिवाजी औटी,अविनाश घुले,गोकुळ बिडवे,बाबा आरगडे,मेजर राउत,एम आर जाधव,देवराम पाटील,इ पदाधिकारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन उपाध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.