रक्षाबंधन- सुरक्षाबंधन सोहळा उत्साहात .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बंधुत्वाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन सण देशभरात काल उत्साहात साजरा झाला त्यानिमित्ताने शहरातील सोनिया गांधी तंत्रनिकेतन मधील इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थिनींनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन मधील अधिकारी व पोलीस बांधवांना राखी बांधून समाज रक्षणाची व महिला सुरक्षेबद्दल अभिवचन घेतले. 


ह्या उपक्रमाने अधिकारी व पोलीस बांधव भारावून गेले. विद्यार्थीनींना कसलीही अडचण आल्यास श्रीगोंदा पोलीस स्टेशन मदतीसाठी तत्पर आहे. अशी ग्वाही पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली. 

ह्या प्रसंगी सहाययक पोलीस निरीक्षक निलेश कांबळेसाहेब, पोलीस हेड कॉन्स्टेबल झुंजार, रिझवान शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वाघ, पो.कॉ. दादासाहेब टाके, पो.कॉ.कोपनर साहेब, पो.कॉ.ढेरे साहेब, पो.कॉ.विलास जगताप, प्राचार्य वीरेंद्र मगर, प्रा. निलेश भोसकर, प्रा.कानिफ उगले, प्रा.विक्रम शिंदे. प्रा. प्रवीण बावधनकर, प्रा.उज्वला दरेकर, राष्ट्रवादी विध्यार्थी तालुकाध्यक्ष विशालकाका लगड, नय्युम तंबोळी, अजय गाडे, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.