गो-रक्षकांवर हल्ला करणाऱ्या ४० जणांवर गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंद्यात शनिवारी गाई पकडून दिल्याच्या रागातून पुण्यातील गोरक्षकांवर श्रीगोंद्यात पोलिस ठाण्यासमोरच एका जमावाने भीषण हल्ला चढवला होता. यात गोरक्षक जखमी झाले होते. 


याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २४ रा. शिवाजीनगर पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अतिक कुरेशी, अण्णा भंगारवाला सय्यद, तय्यब कुरेशी, नदीम कुरेशी, फिरोज कुरेशी, शब्बीर बेपारी, रमजू कुरेशी, मैनुद्दीन कुरेशी, तय्यब कुरेशी, काल्या कुरेशी, मुन्ना बेपारी, मुस्ताफ कुरेशी, नदीम कुरेशी, मुनाफ कुरेशी, बाबू कुरेशी, मोबिन कुरेशी (सर्व रा. श्रीगोंदा) व इतर कुरेशी समाजातील ४० ते ४५ जणांविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, आर्म ॲक्ट,दरोडा तसेच सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करून दंगल पसरवणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर असे की, काष्टीच्या बाजारातून कत्तलीसाठी घेऊन जणाऱ्या गायी पकडून दिल्याचा राग येऊन गोरक्षकांवर आरोपींनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून जख्मी केले. यावेळी अतिक कुरेशी व इतर इसमांनी नितीन देशमुख यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन लंपास केली. असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

या हल्ल्यात नितीन देशमुख, निखिल झरांडे, प्रवीण गायकवाड, उपेंद्र बलकवडे, केतन बासुदकर हे गोरक्षक जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार हे करीत आहेत. दरम्यान कालच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज श्रीगोंद्यात आर.सी.पी च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. श्रीगोंद्यात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान काल हल्ल्यात जखमी झालेल्या गोरक्षकांना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातून त्यांच्या मूळ गावी पुणे येथे रवाना करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.