श्रीगोंद्यात अल्पवयीन मूकबधिर मुलीवर अत्याचार, आरोपीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तालुक्यातील अधोरेवाडी येथे शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या एका शेतमजुराच्या अल्पवयीन मुकबधीर मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली असून यातील आरोपी सागर काकासाहेब प्रतापे (मूळगाव-घारगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक शेतमजूर जोडपे श्रीगोंदा तालुक्यातील अधोरेवाडी येथे मागील दोन ते तीन वर्षांपासून शेतमजूर म्हणून काम करीत आहे. त्यांना एक अल्पवयीन मूकबधीर मुलगी असून सदर मुलीचे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करणाऱ्या सागर काकासाहेब प्रतापे याने गुरूवार दि. ३१ रोजी सायंकाळी कशाचे तरी आमिष दाखवून दुचाकीवरून त्याच्या मूळगावी पळून घेऊन गेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी मंगळवार दि. १ रोजी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सदर आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यावर पोलिसांनी तपास करून दि. २ ऑगस्ट रोजी या आरोपीला अटक केली आणि मुलीला देखील ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याची कबुली दिली असून पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादिवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आरोपी प्रतापे याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.