स्टेट बँकेच्या श्रीगोंदा शाखेत ग्राहकांना उद्धट वागणूक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा स्टेट बँकेमध्ये खातेदारांची आणि ग्राहकांची जबरदस्त पिळवणूक केली जात असून ,या बँकेतील काही कर्मचारी बँकेचे मालक असल्यासारखे वागतात. ग्राहकांना सौजन्याची वागणूक देत नाहीत, उलट मग्रुरीने वागतात. त्यामुळे ग्राहक नाक दाबून बुक्क्याचा मार सहन करीत आहेत. तीन दिवसापासून कॅश शिल्लक नसल्याचे सांगून आपल्याला परत पाठविल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. तुकाराम दरेकर यांनी केली आहे.

स्टेट बँकेच्या तक्रार पोर्टल वर ऑनलाईन तक्रार करताना प्रा. दरेकर म्हणाले, १ ऑगस्टपासून कॅश नाही असे सांगून खातेदारांना परत पाठविले जात आहे. आपलाच पैसा आपल्याला काढता येऊ नये आणि तो देखील स्टेट बँकेतून,या सारखी लाजीरवाणी गोष्ट नाही.

कॅश नसेल तर खातेदाराला सौजन्याने सांगण्याचे कर्मचा-यांचे काम आहे. परंतु काही कर्मचारी बँकेचे मालक असल्या सारखे वागतात. श्रीगोंदा शाखेच्या अकौन्टंट श्रीमती राठोड यांच्या उध्दट वागण्या बद्दल आपण वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

उद्धट कर्मचा-यांच्या वागण्यात बदल न झाल्यास आणि ग्राहकांना तत्पर सेवा न दिल्यास स्टेट बँकेच्या विरोधात सर्व ग्राहकांना बरोबर घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही आपण तक्रारीत दिलेला आहे. नवीन आलेल्या शाखाधिका-यांकडे श्रीमती राठोड यांच्याबद्दल आपण तक्रार केली असल्याचेही प्रा. दरेकर म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.