विसापूरच्या लाभ क्षेत्रातील गावे कुकडी प्रकल्पातच : पाचपुते


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरणाचा समावेश कुकडी प्रकल्पात असल्याने विसापूरच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या गावांना अगोदरपासून कुकडीच्या आवर्तनाचे पाणी मिळत असल्याने त्यांचा पुन्हा कुकडी प्रकल्पात समावेश करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती माज़ीमंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली.

पाचपुते यांनी सांगितले की, तालुक्यातील विसापूर धरणाचा समावेश कुकडी प्रकल्पात असल्याने विसापूरच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या गावांना अगोदरपासून कुकडीच्या आवर्तनाचे पाणी मिळते. त्यामुळे या गावांचा त्यांचा पुन्हा कुकडी प्रकल्पात समावेश करण्याची आवश्यकता नसल्याची निर्णय कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

यापुढे कुकडीचे पाणी विसापूर धरणात सोडण्याची मागणी करावी लागणार नाही,असा निर्णयदेखील झाला आहे. याबाबत लोणी येथील शेतकरी गणपतराव काकडे यांच्यासह आपण अपील दाखल केले होते. याबाबतचा निर्णय नुकताच जलसंपदा विभागाच्या कार्यकारी संचालक यांनी दिला आहे, अशी माहिती पाचपुते यांनी पत्रकाराशी बोलताना दिली. 

विसापूरच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, शिरसगाव, पिसोरे आदी गावांना मागील काही वर्षांपासून कुकडीतून का विसापूर प्रकल्पातून पाणी मिळणार, यावरून संघर्ष करावा लागत होता. अनेक वेळा पाणी मिळत नव्हते. यामुळे उभी पिके पाण्यावाचून जळून ज़ात होती.याबाबत माजी पंचायत समिती सभापती गणपतराव काकडे आणि माजीमंत्री बबनराव पाचपुते आदींनी महाराष्ट्र जल नियामक प्राधिकरणाकडे अपील दाखल केले होते. 

याबाबत कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्पात आधीपासूनच विसापूर मध्यम प्रकल्पाचा समावेश असल्याने या लाभ क्षेत्रातील गावांचा पुन्हा कुकडी प्रकल्पात समावेश करण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय देण्यात आला आहे,असे पाचपुते यांनी सांगितले. या वेळी नगराध्यक्ष मनोहर पोटे, ॲड. जालिंदर अनभुले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.