ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांच्या कारला अपघात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ज्येष्ठनेते शिवाजीराव नागवडे यांच्या कारला सोमवारी (दि.२१) सकाळी दहा वाजेच्या सुमारास परिक्रमा संकुलासमोर अपघात झाला. या वेळी चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या खाली उतरवल्याने मोठा अपघात टळला. ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे हे सुखरूप असून, समोरून येणाऱ्या दुचाकीवरील तरुण किरकोळ जखमी झाले आहेत. 


याबाबतची माहिती अशी की, सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे कामानिमित्त (एम एच १६ बी. एच २५२५) या ऑडी गाडीने पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यांची गाडी परिक्रमा संकुलासमोर आली असता, एक कुत्रे आडवे आले, याचवेळी रस्ता ओलांडून जाणारी तरुणांची दुचाकी अचानक समोर आलीे. या तरुणांना वाचविण्यासाठी चालकाने गाडी रस्त्याच्या खाली उतरवली.रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी साचलेले असल्याने गाडी त्या पाण्यात गेली. या वेळी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. 

अपघातात काष्टी येथील संतोष चौरे व नीलेश कोकाटे हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांच्या कारला अपघात झाल्याची वार्ता तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. मात्र, नागवडे सुखरुप असल्याचे समजल्यानंतर सर्वांचा जीव भांडयात पडला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.