श्रीगोंद्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तालुक्यातील बेलवंडी येथे रविवारी (दि. १३) एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. सीताराम वेताळ पवार (वय ४५, रा. बेलवंडी) व संगीता ईश्वर कोठारी (वय ४८, रा. बेलवंडी) अशी मृत्यमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.


सीताराम पवार हे आज सकाळी नऊ वाजता घरावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. बांधकामाला ते पाणी मारण्यासाठी घरावर चढले होते. पाणी मारण्यासाठी त्यांनी शिडीचा आधार घेतला होता. त्यावरून ते खाली पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत संगीता कोठारी यांचा घराला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. कोठारी यांची तीन मजली इमारत आहे. त्या दुपारी तिसऱ्या मजल्यावरील खोलीत आराम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या खोलीला अचानक आग लागली. ही आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.