श्रीगोंदा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचेे अपहरण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील पाच वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून तीच्या जवळच्या नातेवाईकानेच अपहरण केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नातेवाईक असलेल्या आरोपीविरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील उक्कडगाव येथील एक महिला आपल्या एक मुलगी व दोन मुलांसह आई वडिलांजवळ राहाते. शेतात मजुरी काम करून आपली उपजिविका करते. दि.८ऑगस्ट रोजी संबंधित महिला शेतमजुरीच्या कामासाठी गेली असता सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्या महिलेच्या पाच वर्षीय मुलीचे एका जवळच्या नातेवाईकाने खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून अपहरण केल्याचे समजले.

त्यावर त्या महिलेसह इतर नातेवाईकांनी या मुलीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु कुठेच तपास लागला नाही, दोन दिवस शोध घेऊनही मुलगी न सापडल्यामुळे एका नातेवाईका विरूध्द खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून आपली मुलगी पळून नेल्याची फिर्याद या मुलीच्या आईने दिली आहे.

 त्यावरून सदर आरोपीविरोधात फूस लावून पळवून नेल्याबाबत बेलवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईक असलेल्या आरोपीनेच अल्पवयीन मुलीचे अपहरण का व कशासाठी केले. याचा शोध पोलिस घेत आहेत.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरी व दरोड्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच दिवसाढवळ्या पोलिस ठाण्यासमोरच गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. तालुक्यात यापूर्वीही अपहरणाच्या घटना घडल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.