भीमा नदीपात्रात सापडल्या जिलेटीनच्या कांड्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील गार येथे भीमानदीपात्राच्या बाजूला वनविभागाच्या हद्दीत १७,५०० रुपये किमतीच्या बेवारस जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या आहेत.याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय स्फोटक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा वनविभागाचे वनपाल आप्पासाहेब रामभाऊ शिंदे हे काल दि.१०रोजी साडेचार वाजता त्यांच्या सहकाऱ्यांसह गार येथील भीमानदीपात्रालगत वनविभागाच्या हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना १७,५०० रुपये किमतीच्या बेवारस जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. 

त्यांचा पंचनामा करून त्या जप्त करण्यात आल्या असून, शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात भारतीय स्फोटक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.