श्रीगोंदे तालुक्यांतील अक्षय बनला इस्त्रो मध्ये शास्त्रज्ञ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदे तालुक्यांतील देवदैठण येथील अक्षय पंडित वेताळ हा तरुण असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर जिद्द व मेहनतीने भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो ) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.

                                                 

अक्षय चे आईवडील दोघेही प्राथमिक शिक्षक. त्याचे प्राथमिक शिक्षण मलठण व अण्णापूर तर माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला शिरुर येथे झाले. बारावी विज्ञान शाखेत 91% गुण मिळवून जे इ इ परीक्षे च्या माध्यमातून आयआयटी खरगपूर येथे आर्किटेक्चर शाखेत निवड झाली होती पण अंतराळ संशोधन कडे अक्षयचा कल होता

त्यानंतर तिरुअनंतपूर (केरळ ) येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ़ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये 156 विद्यार्थ्यांच्या बॅच मध्ये प्रवेश मिळाला. देशातील हे एकमेव कॉलेज आहे .ए पी जे अब्दुल कलाम हे या कॉलेजचे कुलगुरू होते तेथे चार वर्षात बी टेक एव्हीओनिक्स पदवी ८१ टक्के गुण प्राप्त करून मिळवली. या बॅच मधून १०२ विद्यार्थी इस्त्रो साठी निवडले गेले त्यात महाराष्ट्रातील अक्षय सह तिघेजण आहेत .

स्कॉलरशिप मिळवून कॉलेजची फी भरली
पुढील महिन्यात स्पेस ऑप्लिकेशन सेंटर अहमदाबाद(गुजरात) येथे शास्त्रज्ञ क्लास वन अधिकारी म्हणून हजर होणार आहे .हे शिक्षण घेत असताना प्रत्येक सेमिस्टरला 75% गुण मिळवून 46000 रुपये स्कॉलरशिप मिळवली व त्यातूनच कॉलेजची फी अक्षयने भरली. मन लावून अभ्यास केल्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड दिला नाही.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेत राहून भारतमाते ची सेवा अखंड पणे करत रहाणार व देशसेवा हेच माझे करिअर आहे. ए पी जे अब्दुल कलाम यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवणार आहे. शालेय जीवनात विस्तार अधिकारी मुकुंद देंडगे यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले .आई वडील व सर्व गुरू यांना हे यश समर्पित करतो. - अक्षय वेताळ

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
                                                 --------------------------------

Powered by Blogger.