शिर्डीची सुरक्षा केवळ साई भरोसे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिराची सुरक्षा रामभरोसे सुरू आहे. पिंपळवाडी रस्त्यालगत असलेल्या मुख्य दर्शन रांगेतील दोन्ही स्कॅनर मशिन बंद अवस्थेत असून सुरक्षा यंत्रणेने त्याकडे कानाडोळा केला आहे.

मुख्य दर्शन रांगेतून (गेट नं.1) दररोज हजारोपेक्षा जास्त साईभक्त दर्शन घेण्यासाठी मंदिरात येतात. मंदिराची सुरक्षा या कारणास्तव साईसंस्थानने गेट नं. 2 जवळील पश्‍चिम बाजूस असलेल्या दर्शनरांगेत भक्तांच्या वस्तू, पर्स व इतर साहित्य तपासणी करण्यासाठी संस्थानच्या सुरक्षा विभागामार्फत दोन ओ.एस.आय. मार्कचे स्कॅनर मशीन बसविलेले आहे.

येणाऱ्या प्रत्येक साईभक्तांच्या वस्तू त्याद्वारे तपासण्यात येतात. त्यामुळे मंदीराची सुरक्षा अबाधीत राहते. मात्र मागील काही महिन्यापासून दोनही स्कॅनर मशीन बंद पडलेले असून त्याच जागेवर धूळखात पडल्याने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असलेल्या साईमंदिराची सुरक्षा रामभरोसे झाली असल्याचे चित्र बघण्यास मिळत आहे.

संबंधित दोन्ही स्कॅनर मशीन रॅपीस्कॅन कंपनीचे असून त्यावर ओ.एस.आय मार्कचा शिक्का मारला आहे. त्यामुळे त्यांच्या खरेदीबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या बंद पडलेल्या मशिनरीच्या ठिकाणी कंत्राटी सुरक्षा कर्मचारी पहारा देण्याचे काम करत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.