रोटरी तर्फे शेवगावला तारूण्यभान विषयावर डॉ. राणी बंग यांची कार्यशाळा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रेसिडेन्सिअल विदयालयात गुरूवार ( दि . 10 ) ते शनिवार ( दि. 12 ) दरम्यान तारूण्यभान या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ समाजसेविका व महाराष्ट्र भूषण डॉ. राणीताई बंग या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. राणीताई बंग या गडचिरोली येथे सर्च संस्थेच्या माध्यमातून त्यांचे पती व महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांच्या समवेत आरोग्य व शिक्षण या विषयावर गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांनी तारूण्यभान या विषयावर राज्याच्या कानाकोप-यात 300 पेक्षा अधिक कार्यशाळा घेतल्या असून 55 हजारांपेक्षा अधिक तरूण - तरूणींना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. 

वैज्ञानिक शिक्षण व दैनिक शिक्षणाने मुले मुली बिघडत नाहीत, तर अधिक जबाबदार होतात, असा डॉ. बंग यांचा दावा आहे. आपल्या मुला मुलींच्या बाबतीत भविष्यात निर्माण होणा-या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ही तारूण्यभान कार्यशाळा उपयुक्त असून पालक व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष बी. जे. काटे, इनरव्हीलच्या अध्यक्षा डॉ. प्रिती राठी, वसुधा सावरकर, डॉ. मनिषा लड्डा, डॉ.संजय लड्डा , प्रा. दिलीप फलके, डॉ. दिनेश राठी, प्रा. किसन माने आदींनी केले आहे.

 शुक्रवारी ( दि. 11 ) रोजी सांयकाळी 6 वाजता तारूण्याच्या अवघड वळणावर या विषयावर डॉ. राणी बंग यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम रेसिडेन्सिअल विद्यालयाच्या प्रांगणात होणार असून पालक व मुलां मुलींनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.