सत्यजीत तांबेची उड्डानपुल व रिंग रोड रस्त्याच्या कामाची तळमळ कौतुकास्पद - गडकरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अ. नगर शहरातील नागरीकांच्या अत्यंत जिव्हाळ्यााचा असलेला परंतु अनेक दिवसांपासून रखडलेला उड्डानपूल व बाह्यवळण रस्त्याच्या कामासंदर्भात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेवून हे काम तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली आहे.

अ. नगर शहरातील उड्डान पूल व बाह्यवळण रस्त्यांचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. हे काम तातडीने पुर्ण व्हावे ही शहरातील नागरीकांची अनेक दिवसांपासून मागणी आहे. या उड्डानपूल व बाह्यवळण रस्त्यामुळे शहरात वाढलेली गर्दी, ट्रॉफिक समस्या, प्र्रदुषन व वाढलेले अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.

म्हणून या कामाच्या पुर्ततेसाठी सत्यजीत तांबे यांनी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, या खात्याचे मंत्री, अधिकारी, व शासन दरबारी त्यांनी या कामाच्या पुर्ततेसाठी कायम आग्रह धरला.

शहरातील नागरीकांसाठी हा उड्डान पूल व बाह्यवळन रस्ता विकासाचा महत्वाचा टप्पा ठरणार आहे. म्हणून नागरीकांसह सत्यजित तांबे यांच्या मागणीवरुन कालच नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी लक्षवेधी व्दारे विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधले होते.

प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याची आग्रही मागणी
या प्रश्‍नाला उत्तर देतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उड्डान पुलाचे काम केंद्र सरकारकडून करण्यात येणार असल्याचे उत्तर दिले होते. त्यामुळे युवा नेते सत्यजित तांबे यांनी तातडीने नवी दिल्ली येथे जावून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. व अनेक दिवसांपासून रखडलेला हा उड्डानपूल व रिंगरोडचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली.

तीन महिन्यात उड्डानपूलाचे काम सुरु होणार 
यावर ना. नितीन गडकरी यांनी सत्यजित तांबे यांची या कामाची तळमळ व सातत्याने केलेला पाठपुरावा लक्षात घेवून येत्या तीन महिन्यात हे काम सुरु करण्यात येईल असे आश्‍वासन दिले आहे. नगर शहराच्या वैभवात भर टाकणार्‍या या उड्डान पूल व रिंग रोड कामाच्या सततच्या पाठपुराव्याबद्दल अ. नगर मधील नागरीकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे.

तांबेची उड्डानपुल व रिंग रोड रस्त्याच्या कामाची तळमळ कौतुकास्पद - गडकरी
नगरच्या बहुप्रतिक्षीत उड्डानपुल व रिंग रोड रस्त्याच्या कामाची तळमळ व सततचा पाठपुरावा कौतुकास्पद असून सत्यजीत तुझ्या उपस्थितीतच उदघाटनाचा कार्यक्रम घेण्यात आनंद राहिल असे ही ना. नितीन गडकरी म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.