पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा; ५ जणांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  संगमनेर शहरातील जेधे कॉलनी येथील जुगार अड्डयावर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकल्याची घटना मंगळवार दि.८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजता घडली. चार मोटारसायकली, पाच मोबाईल असे एकूण १ लाख १२ हजार रुपये किंमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. तर पाच जणांना पोलिसांनी अटकही केली. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली. 

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील जेधे कॉलनी याठिकाणी अवैधरित्या जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांना गुप्त खबऱ्यामार्फत समजली. त्यामुळे माहिती मिळताच पोलिस कॉन्स्टेबल सचिन उगले, तांबे, शहाणे आदी पोलिस पथकाने याठिकाणी छापा टाकला.

त्यावेळी संदीप दत्तु तागडे (वय-३६,रा.लक्ष्मीनगर), हरिष कैलास जेधे (वय-३१,रा.अकोले नाका), बबलु तान्हाजी गुंजाळ (रा.ढोलेवाडी), किरण बबन नाईक (रा.ढोलेवाडी), निलेश सोमनाथ मंडलिक (रा.ढोलेवाडी), शेखर जेधे या सर्वांना अवैधरित्या जुगार खेळतांना पोलिसांनी पकडले. 

त्यातील शेखर जेधे हा फरार झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी चार मोटारसायकली, पाच मोबाईल असे एकूण १ लाख १२ हजार रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध मुंबई जुगार ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.