पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात चार गंभीर जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरुडी फाटा येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला आयशर टेम्पो धडकल्याची घटना रविवार दि. ६ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात टॅम्पोमधील चार जण जखमी झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पुण्याकडून नाशिककडे आयशर टॅम्पो चालला होता. तर वरुडी फाटा येथील एका हॉटेलवर मालवाहू ट्रकचा चालक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करुन चहा पिण्यासाठी थांबला होता.

त्याच दरम्यान आयशर टॅम्पो चालकाने मालवाहू ट्रकला पाठिमागून जोराची धडक दिली. या अपघातात टॅम्पोमधील विजय कुमार सिंग (वय-२८), सुनिल कुमार सिंग (वय-२५, दोघे रा.बिहार), सुरेश शिरसाठ (वय-३८,रा. मुसळगाव, ता.सिन्नर, जि.नाशिक) व सुनिल बर्डे (वय-२३, रा.कनघर, ता.राहुरी, जि.अ.नगर) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 

अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. व जखमींना संगमनेर येथील खासगी रूग्णालयात औषधोपचारासाठी दाखल के ले. याबाबत अद्यापही घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.