ध्येय समोर ठेवत उघड्या डोळ्यानी स्वप्नं पहा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महिलाचे एकत्री करण करुन त्याच्या विविध शंकाचे निरसन करत महिलाना अर्थिकं सुबंत्ता व स्थैर्य प्राप्त व्हावे हा एकमेव हेतु डोळ्यासमोर ठेवत या परिसरात महिला बचत गटाची संकल्पना राबवली आहे. त्यामुळे महिलानी आता चूल आणि मूल या मानसिकतेतुन बाहेर पडत प्रगतीचे ध्येय समोर ठेवत ते पूर्ण करण्यासाठी उघड्या डोळ्यानी स्वप्नं पाहिल्यास तुमच्या ध्येयाच्या आड कोणीही येणार नाही असे प्रतिपादन जय हनुमान उद्योग समुहाचे संस्थापक विलासशेठ उंबरकर यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे राधिका महिला अँग्रो प्रोड्युसर कंपनीने आयोजित केलेल्या बचत गटातील महिलाना मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी कंपनीच्या अध्यक्षा कुंदाताई उंबरकर, नवी दिल्ली कृषी व्यापार संघाचे कृषी सल्लागार प्रा. विजय आठवले, संगमनेर कृषी विभाग व आत्माचे वैभव कानडे, सहाय्यक तंत्रज्ञान अधिकारी अमोल आंधळे, अनिताताई चौधरी, सुनिताताई देशमुख, संगीताताई मदने व शरद भुसाळ आदिसह महिला व ग्रामंस्थ उपस्थित होते.

प्रा. विजय आठवले म्हणाले की, शेतकरी संघटीत नसल्यामुळे त्याची व्यापा-याकडून फसवणूक केली जाते. अर्थिकं, सामाजिक व पारदर्शी विकास प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून साधला जावू शकतो. आपल्या देशात ११०० प्रोड्युसर कंपण्या अस्तित्वात असून बोटावर मोजता येणा-या कंपण्यापैकी राधिका महिला अँग्रो प्रोड्युसर कंपनीची वाटचाल हि इतराना दिशादर्शक आहे. महाराष्ट्रातील काही मोजक्या कंपण्यापैकी एसएफएसी चे नऊ लाख चोवीस हजाराचे अनुदान मिळवण्यात यंशस्वी झाल्याबद्दल राधिका महिला अँग्रो प्रोड्युसर कंपनी व महिलाचे त्यानी अभिनदंन केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.