गद्दार हिंदू पेक्षा प्रामाणिक मुसलमानचा आदर करा - डॉ. विजय तनपुरे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :इतरावर टिका करत वेळेचा दुरउपयोग करण्यापेक्षा त्या वेळेचा वापर स्वंता:च्या व समाजाच्या सुधारणेसाठी खर्च करा. म्हणजे तुम्हाला इतरावर टिका करायला वेळेच मिळणार नाही. आपल्या संत परंपरेत अनेक मुस्लिम संतानी योगदान दिले असून वारकरी सप्रंदायात हभंप जल्लाल महाराज संय्यद याचे योगदान उठून दिसत आहे. त्यामुळे गद्दार हिंदू पेक्षा प्रामाणिक मुसलमान म्हणून शिवरायाचा मावळा मदारी मेहत्तर हा इतिहासात अमर झाला आहे. असे गौरोद्गार शिवशाहिर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी काढले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे सुरु असलेल्या सप्ताहात उभ्या महाराष्ट्राला श्रध्देतून राष्ट्रभक्ती, महिला शक्ती व जातिय सलोख्याची शिकवण व जागर करणा-या सप्ताहात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिवशाहिर डॉ. विजय महाराज तनपुरे यांचा यावेळी आश्वी खुर्द ग्रामंस्थ व सप्ताह कमिटीच्या वतीने सत्कांर करण्यात आला. याप्रसंगी आश्वी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तनपुरे महाराज पुढे म्हणाले की, आपला भारत देश हा विविध जाती-धर्मानी बनला असला तरी आश्वी खुर्द येथिल सप्ताहात सुरु असलेला राष्ट्रीय एकात्मतेचा जागर हिचं आपल्या विविधतेतील एकतेची ताकत आहे. मदारी मेहत्तरं, हिरोजी फर्जत, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, संगीतकार ए. आर. रेहमान, क्रिकेटपट्टू झहिर खान, युसुफ पठान, इरफान पठान व मोहम्मंद कैफ यांचा गौरव केला तर टेनिस खेळाडू सानिया मिर्झाला पाकिस्तानी क्रिकेटपट्टू बरोबर लग्न केल्यामुळे चिमटाही काढला आहे.

दरम्यान छत्रंपती शिवाजी महाराज व छत्रंपती संभाजी महाराज यांच्या चरित्राचं अनुकरन करण्याचे आवाहण त्यानी केले. तर सिमी व लष्करे तोयबा सारख्या दहशतवादी संघटनाचा खरपूस समाचार घेत प्रामाणिक मुसलमानाचा आदर करण्याची शिकवण छत्रंपती शिवाजी महाराजानपासून चालत आली आहे, तिचे पालन करा असे ते शेवटी म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.