युवकास मारहाण प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात शेतातील घास पिकातून जाण्याच्या वादातून एका युवकास शिवीगाळ करीत कोयत्याने मारहाण करण्यात आली. दि. २६ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी युवकावर सध्या उपचार सुरु आहेत. याप्रकरणी बाप-लेकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात संदीप नामदेव काळे यांचे शेत आहे. शेतात त्यांचा सामायिक बांध आहे. संदीप काळे यांचा चुलतभाऊ सचिन ज्ञानदेव काळे हा शेतातील घास पिकातून जात होता. त्यास घास पिकातून जावू नको, बांधाने जा, असे संदीप काळे सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपी सचिन काळे याने संदीप काळे यास शिवीगाळ करीत कोयत्याने डाव्या हाताच्या मनगटावर व डोक्याखाली मारून जखमी केले. त्यावेळी चुलते ज्ञानदेव गोधाजी काळे यांनी हात पकडून ठेवले. मारहाण केल्यानंतर दोघे बाप - लेक पसार झाले.

जखमी संदीप काळे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी संदीप नामदेव काळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी बाप-लेकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्याला गु.र.क्र. १०९/१७, भादंवि कलम ३२४, ४४७, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. लक्ष्मण औटी अधिक तपास करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.