संगमनेरात दोघांकडून लोखंडी गुप्ती व तलवार जप्त.



अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर शहरात गणपती उत्सवाच्या तोंडावर दोघा जणांकडून लोखंडी गुप्ती व तलवार शहर पोलिसांनी जप्त केल्याची घटना शनिवार दि. १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे दोघांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील पावबाकी रोडवर असणारे सप्तश्रृंगी मंदीरासमोर शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शब्बीर दादाभाई शेख (रा.माताडे मळा) याच्याकडे लोखंडी तलवार असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना समजली.

त्यांच्यासह पोलिस पथकाने त्या ठिकाणी जावून शेख याला तलवारीसह ताब्यात घेतले. तर शहरातीलच एका कॉलनीमध्ये असणाऱ्या आकाश राजू कागडे याच्याकडेही गुप्ती असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यामुळे पोलिसांनी कागडे याच्या घरी जावून त्याला गुप्तीसह ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर व पोलिस नाईक विजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी दोघां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.एस.फटांगरे, पोलिस नाईक रामनाथ सानप हे दोघे करीत आहेत. 

दरम्यान संगमनेर शहरात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. अवघ्या तेरा दिवसांवर येवून गणपती उत्सव ठेपले आहेत. त्यामुळे संगमनेर शहरात गणपती उत्सवाच्या काळात काही अनूचित प्रकार घडू नये, म्हणून संगमनेर शहर पोलिसांनी कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. शहरात आणखी किती जणांकडे अवैध शस्त्र आहेत, याचा शोधही शहर पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.