आर्थिक खर्चाला कंटाळून पुण्याच्या युवकाची आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आर्थिक खर्चाला कंटाळून रुपेश रविंद्र देवरे (वय 32, रा. पुणे, हल्ली मुक्‍काम-जनतानगर, गल्ली नं. 3) या युवकाने राहत्या भाड्याच्या खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या पूर्वी घडली.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रुपेश देवरे हा पुण्याचा युवक संगमनेरात गवंडी काम करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होता. पत्नी व दोन मुलांना घेवून तो जनतानगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. हातावरचे गवंडी काम असल्याने घराचे भाडे, मुलांच्या शाळेचा खर्च व आजारपणाचा खर्च त्याला पेलावला नाही. दुपारी आपल्या कुटूंबासमवेत तो दवाखान्यात आला होता. तुम्ही मागून या मी पुढे जातो असे सांगून तो घरी आला.

घरात कोणी नसतांना त्याने घरात असणाऱ्या साडीच्या सहाय्याने लोखंडी ऍगलला गळफास घेवून आत्महत्या केली. घरचे लोक आल्यानंतर त्यांना ही घटना निदर्शनास आली. घरात गरीबी असल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहर पोलिसांनी आकस्मता मृत्युची नोंद केली असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल आर. ए. पठाण करत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.