खा.दिलीप गांधी यांचे खराब रस्त्यास नामकरन; राहुरीत अनोखे आंदोलन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-राहुरी तालुक्यातील काेंढवड येथील ग्रामस्थांनी काेंढवड ते उंबरे रस्त्याला अहमदनगर दक्षिण लाेकसभा मतदारसंघाचे ʻकर्तव्यदक्ष खासदार दिलीपजी गांधीʼ असे नामकरण करून गांधीगीरी करत लाेक प्रतिनिधिंचा निषेध केला.

 VIDEO पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा - https://goo.gl/wCZFNX


                                           

गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या काेंढवड उंबरे रस्ता हा परीसरातील जनतेच्या व शनिशिंगणापुरला जाणाऱ्या दृष्टीने महत्वाचा आहे.काेंढवड येथील उंबरे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रस्त्यावरील खड्ड्‌यांनी पाटाचे पाणी साचल्याने वाटसरूंना प्रवास करताना खड्ड्‌यातून रस्ता शाेधून प्रवास करावा लागत आहे.

 लाेकप्रतिनीधींचे साेयीस्कर दुर्लक्ष 
यारस्त्याची तातडीने दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा करूनही लाेकप्रतिनीधींनी याकडे साेयीस्कर दुर्लक्ष केले आहे.राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या या रस्त्याचे अनेक वर्षापासून काम झालेले नाही. 

गावकरी व प्रवाशांची तारेवरची कसरत 
या रस्त्यावरून नाेकरदार, विद्यार्थी, शेतकरी, शिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांची वर्दळ असते. रस्त्याच्या दाेन्ही बाजुंनी खाचखळगे पडले असून त्यातच पाटाचे व पावसाचे पाणी या खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहने चालविताना गावकऱ्यांना व प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दूसरा पर्याय नसल्याने माेठा मनस्ताप
तसेच वेड्या बाभळींनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने हा रस्ता ठिकठिकाणी अरूंद झाला आहे. या भागातील शेतकऱ्यांना या रस्त्याशिवाय दूसरा पर्याय नसल्याने माेठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

यावेळी काेंढवडचे उपसरपंच विजय म्हसे,शिलेगावचे सरपंच रमेश म्हसे,सेवा संस्थेचे जगन्नाथ म्हसे, क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधूकर म्हसे, प्रदेश कार्याध्यक्ष संदिप ओहळ, जिल्हाध्यक्ष जालिदंर शेंडगे, तालुकाध्यक्ष संदीप उंडे, शेतकरी सेलचे गाेरक्षनाथ म्हसे, अनिल म्हसे,अनिल हिवाळे, किशाेर म्हसे, अर्जून म्हसे, आकाश म्हसे, विनाेद म्हसे, विकास हिवाळे,राहुल म्हसे, पप्पू हिवाळे,यशाेदीप म्हसे, राेहित पवार, शुभम म्हसे, बबलू औटी, राजेश्वर औटी, माेनू म्हसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित हाेते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.