राहुरी शहराचा पाणीप्रश्‍न सुटणार - आमदार कर्डिले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी शहरातील 28 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली आहे.
आमदार कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुरी शहराच्या 28 कोटींच्या पाणीपुरवठा योजना व ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्‍नांबाबत राहुरीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबई भेट घेतली. यावेळी राहुरीच्या सुमारे 28 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.

तसेच, राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या सुमारे 17 कोटींच्या प्रस्तावास डिसेंबर 2017 मधील अधिवेशनात आर्थिक तरतूद करण्याचे आश्‍वासनही दिले. शहरातील महत्त्वाचे दोन प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात आला.

या शिष्टमंडळात रावसाहेब (चाचा) तनपुरे, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, सुभाष वराळे, योगेश देशमुख, विजय डौले, ज्ञानेश्‍वर पोपळघट, अशोक घाडगे, नगरसेवक सोन्याबापू जगधने, डॉ. धनंजय मेहेत्रे, नितीन तनपुरे, भाऊसाहेब काकडे, प्रदीप भुजाडी, आतिक बागवान, गणेश खैरे, आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 


अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.