राहुरीतल्या पाच रस्त्यांसाठी ४६ लाखांचा निधी - आ. शिवाजी कर्डिले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ३० - ५४ योजनेअंतर्गत राहुरी तालुक्यातील पाच रस्त्यांना ४६ लक्ष रू. निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ. शिवाजी कर्डिले यांनी दिली.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशान्वये ३० - ५४ योजनेअंतर्गत राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द ते सडे चौकी रस्ता (१० लक्ष), चंडकापूर ते वांढेकर वस्ती रस्ता (९ लक्ष), वाघाचा आखाडा ते येवले आखाडा रस्ता (९ लक्ष), सात्रळ ते गिते वस्ती, इरीगेशन बंगला (९ लक्ष), पिंप्री अवघड ते सडे रस्ता (९ लक्ष) या पाच महत्त्वाच्या रस्त्यांना एकूण ४६ लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे या कामाची लवकरच सुरूवात करण्यात येणार असल्याचे आ.कर्डिले यांनी सांगून ग्रामविकास मंत्री मुंडे यांचे आभार मानले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.