सोनगाव मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सेवा संस्कार संस्थेचे श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड येथील चतुर्थ वर्षातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोनगाव येथे ७१ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


या प्रसंगी BSF तमाजी खेमनर व डॉ.के.के.बोरा व आनंद गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल यांचे हस्ते सकाळी ८.०० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी आनंद गुरुकुलाच्या विद्यार्थीनींनी सुरेल आवाजात राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन केले.

या कार्यक्रमाप्रसंगी मा.श्री. तमाजी खेमनर (BSF) डॉ. के.के.बोरा (चेअरमन आनंद गुरुकुल) श्रीमती कोळेकर मॅडम (मुख्याध्यापक आनंद गुरुकुल) व गुरुकुलचे विद्यार्थी व ग्रामस्थ तसेच कृषीदूत गौरव ब्राम्हणे,पंकज दरंदले,आकाश खैरनार,प्रदिप महाले,प्रशांत वाळे,राहुल साठे,मोहित पवार यांचा सहभाग लाभला.

कार्यक्रमासाठी श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातून प्राचार्य प्रा.डॉ.हारदे सर,कार्यक्रम अधिकारी प्रा.माने सर व राउत मॅडम, प्रा.दसपुते सर, प्रा.तायडे सर, प्रा.कळसकर सर, प्रा.साबळे सर व प्रा.घुले मॅडम त्याचप्रमाणे शासकीय कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा.निकम सर, प्रा.इल्हे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.