ॲट्रॉसिटीच्या गैरवापराविरोधात सामुहिक लढा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता तालुक्यातील चितळी येथे दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीच्या पार्श्वभुमीवर एका गटावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा किती खरा, किती खोटा हा भाग न्यायप्रविष्ट असला तरी सकल मराठा समाजाच्या एकीकरणासाठी जिल्ह्यातील शिवप्रहार संघटनेने पुढाकार घेतला आहे. यावेळी ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापरा विरोधात सामुहिक लढा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.

शनिवारी (दि. १२) दुपारी दोन कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या पार्श्वभुमीवर रात्री दोन समाजातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये एका गटाकडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची, तर दुसऱ्या गटाकडून ॲट्रॉसिटीचा गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला.

दोन गटातील वादामुळे चितळी परिसरात शांततापूर्ण तणावाचे वातावरण असताना सकल मराठा समाजाच्या एकीकरणासाठी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली चक्रे फिरले. शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौघुले, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील साळुंके, उपजिल्हाध्यक्ष दिनेश पवार, कोपरगाव युवा तालुकाध्यक्ष सागर भड व उपशहराध्यक्ष संदीप डुमरे यांनी चितळी येथे भेट देऊन स्थानिक कार्यकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी मराठा व्यक्तिंना जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, त्यांच्यावरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. गेल्या अनेक वर्षापासून चितळी गावात ॲट्रॉसिटी कायद्याच्या पार्श्वभूमीवर नेहमीच तणावपूर्ण वातावरण असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. हा कायदा विशिष्ट समाजासाठी कवचकुंडले असला तरी मराठा समाजाला वेठीस धरण्यासाठी हत्यार म्हणून वापर होत असल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या.

यावेळी उपसरपंच शिवाजीराव वाघ, ॲड. अशोकराव वाघ, ॲड. सचिन वाघ, गणेशचे माजी संचालक बाळासाहेब वाघ, बाबासाहेब दादा वाघ, बाळासाहेब एकनाथ वाघ, पै. रवींद्र वाघ, शैलेश वाघ, बाळासाहेब मुरलीधर वाघ, मच्छिंद्र वाघ, सोपान वाघ, शिवाजी वाघ, रामदास वाघ, दिलीप वाघ, शंकर (बाबा) वाघ, आण्णासाहेब वाणी, उत्तम वाघ आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

या घटनेमध्ये तेरा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी हा गुन्हा संपूर्ण गावावर दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच ही न्यायालयीन लढाई लढण्यासाठी उपस्थितांनी लोकवर्गणी गोळा करून मोठा टेका देतांना सकल मराठा समाज सज्ज असल्याचा संदेश दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.