चांदेकसारे गटात काँग्रेस - राष्ट्रवादीच्या सोनाली रोहमारे विजयी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे जिल्हा परिषद गटात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या सोनाली राहुल रोहमारे यांनी शिवसेनेच्या उमेदवार सिमा औताडे यांचा दोन हजार ३४० मतांनी पराभव करत विजयश्री खेचून आणली. भाजप उमदेवार अश्विनी पाचोरे या तिसऱ्यास्थानी गेल्या. 


रोहमारे यांना १० हजार ३०, औताडे यांना ७ हजार ६९०, तर पाचोरे यांना ६ हजार ७८० मते मिळाली. त्यात रोहमारे यांनी २ हजार ३४० मतांनी विजय संपादन केला. यावेळी पार पडलेल्या विजयी सभेत आशुतोष काळे यांनी सर्व मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानत मतदारांनी दाखविलेला विश्वास या चांदेकसारे गटाच्या सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

कोपरगाव तालुक्याच्या जनतेला आता परिवर्तन हवे असून हा विजय परिवर्तनाची नांदी असल्याचे सांगितले. विजयी उमेदवार सोनाली रोहमारे यांनी मतदारांनी सेवा करण्याची दिलेल्या संधीचे सोने करून युवा नेते आशुतोष काळे मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले. 

यावेळी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, मच्छिंद्र रोहमारे, सचिन रोहमारे, सुनील शिंदे, राहुल रोहमारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.