पाथर्डी नगरपालिकेच्या गैरव्यवहाराची चौकशी होणार.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी नगरपालिकेतील गैरव्यवराहाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन चौकशी करण्याचे आश्वासन नगरपालिका विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस यांनी दुरध्वनीवरुन दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोरूडे यांनी बुधवारी रात्री उशीरा उपोषण मागे घेतले.

पालिकेने केलेल्या विविध विकास कामांत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, या मागणीसाठी बोरुडे यांनी तहसिल कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले होते. शहरात झालेल्या भुमिगत गटार योजना, स्वच्छ भारत अभियान, कॉंक्रिट रस्ते आदी विकास कामाबरोबरच पालिकेचे अनेक व्यवहार संशयास्पद असून यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप बोरुडे यांनी केला आहे. या संपुर्ण कामाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड व अनेक संघटनांनी पाठिंबा दिल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. तहसिलदार नामदेव पाटील यांनी वेळोवेळी बोरूडे यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र बोरुडे आपल्या मागण्यावर ठाम राहिल्याने प्रशासनापुढे मोठा पेच उभा राहिला होता.

बुधवारी रात्री उशीरा तहसिलदार पाटील यांनी पुन्हा आंदोलकांची भेट घेवून नगरपालिका विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा घडवून आणली. कापडणीस यांनी किसन आव्हाड व सोमनाथ बोरूडे यांच्याशी चर्चा केली. पालिकेतील गैरव्यवहाराबाबत दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेवून चर्चा करू व त्यानंतर चौकशी समिती नेमून चौकशी करू असे आश्वासन दिल्यानंतर बोरूडे यांनी आंदोलन मागे घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.