माळीबाभुळगाव ग्रामपंचायतीचा दारूबंदीचा ठराव.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्वातंत्र्य दिना निमित्त माळीबाभुळगाव (ता.पाथर्डी) येथील ग्रामसभे मध्ये दारूबंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.या ठराव मंजूरीचे टाळ्यांच्या कडकडाटामध्ये महिलावर्गासह ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश वाळके हे मागील सहा महिन्यांपासून दारूबंदीच्या ठरावासाठी प्रयत्नशील होते.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्याची योग्य ती अंमलबजावणी व्हावी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांमुळे महार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून ५०० मीटर परिसरात दारूविक्रीवर बंदी घातली आहे.या बंदीमुळे दारूविक्रेते आता आपली दारूची दुकाने ५०० मीटरच्या बाहेर विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत थाटण्यासाठी धडपडत आहेत. अगोदरच ग्रामीण भागात अवैधरीत्या दारू आणून पिणाऱ्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.

त्यातच कायदेशीर मान्यता असणारी दारूची दुकाने जर ग्रामपंचायतींच्या हद्दीत आली व ग्रामपंचायतींनी त्यांना अधिकृत परवानगी दिली तर गावची शांतता व सामाजिक स्वास्थ्य आणखी बिघडू शकते.अशाने कायदा-सुव्यवस्थेचा बिकट प्रश्न निर्माण होऊ शकतो.या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिना निमित्त ग्रामसभेमध्ये झालेल्या ठरावाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना योगेश वाळके म्हणाले, "अपघात,छेडछाड,वादविवाद,कौटुंबीक कलह व आर्थिक अवनती अशा गंभीर घटनांना दारूमुळे हातभारच लागत आहे.त्यामुळे संभाव्य धोका ओळखून ग्रामपंचायतने अशा दारूविक्रेत्या व्यावसायीकांना आपल्या गावच्या हद्दीत दारू दुकांनाना परवानगी देऊ नये,यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. 

महिला व युवावर्गामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही केली.अखेर या प्रयत्नांना ग्रामसभेच्या दारूबंदीच्या ठरावाने यश आले.त्यामुळे गावच्या हद्दीत यापुढे अवैधरीत्या दारूविक्रीचा कोणी प्रयत्न केल्यास ग्रामपंचायत प्रशासनाने त्याविरोधात कठोर कारवाई करावी.या ठरावाची कायदेशीर अंमलबजावणी होईपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून आम्ही प्रत्नशील राहू."

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.