शौचालय नसल्याने मांडवे गावच्या सरपंचाचे सदस्यत्व रद्द.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावच्या सरपंचाकडे शौचालय नसल्याचे आढळून आल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी नुकतेच दिले आहेत. 

मांडवे गावच्या सरपंच सौ. पुष्पा जाधव यांनी वैयक्तिक शौचालय असल्याचे प्रतिज्ञापत्र प्रशासनाकडे सादर केले होते. मात्र, गावातील शिवाजी लवांडे यांनी सरपंचाकडे शौचालय नसल्याची तक्रार केली होती.

ग्रामपंचायत अधिनियमन कलम १४ (ज ) (५) प्रमाणे असणाऱ्या तरतुदीचे सरपंच यांनी उल्लंघन केले असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर पाथर्डी पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने दि. ३१ जानेवारी रोजी पहाटे केलेल्या पाहणी अंती सरपंचाकडील शौचालय वापरात नसल्याचे नमूद करण्यात आले होते.

मांडवे गावच्या ग्रामसेवकानेदेखील सरपंचाकडील शौचालय अपूर्ण व विनावापराचे असल्याचे नमूद केले होते. दोन्ही बाजूच्या पडताळणी अंती दि. ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी सरपंच सौ. जाधव यांचे सदस्यव रद्द करण्याचे आदेश दिले असल्याने मांडवे गावात एकच राजकीय खळबळ उडाली आहे.

या निकालामुळे मांडवे गावात पुन्हा सरपंचपदासाठी राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. दरम्यान, राजकीय आकसामुळे व गावातील कुरघोडीच्या राजकारणामुळेच अशा तक्रारी केल्या जात असल्याचे सरपंच जाधव यांचे म्हणणे आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.