पुढील महिन्यात होणार बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहराबाहेरुन जाणार्‍या बाह्यवळण (राज्य महामार्ग रस्ता क्र.222) रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ऑनलाईन निविदा खुली झाली असून, निंबळक गटातील ग्रामस्थांच्या वतीने दीड वर्षापासून चालू असलेल्या पाठपुरावा व आंदोलनाला यश आले आहे. पुढील महिन्याच्या 9 सप्टेंबर पर्यंन्त निवीदा प्रक्रियाचे कामकाज पुर्ण होवून, प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे.


निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे यांच्या नेतृत्वाखाली निंबळक गटातील ग्रामस्थांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना निवेदन देवून, ठिय्या आंदोलन केले होते. दोन वेळा बाह्यवळण रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करुन या प्रश्‍नावर अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले होते. तसेच जि.प. सदस्य माधवराव लामखडे यांनी देखील या विषयात लक्ष घालून वारंवार केलेल्या पाठपुराव्याने यश मिळाले आहे. 

नुकतेच निंबळक गटातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांना घेराव घालून, रस्ता दुरुस्ती तातडीने न झाल्यास सदर रस्ता मध्यभागी खोदून वाहतुकीसाठी बंद करण्याचा इशारा दिला होता. ग्रामस्थांच्या आंदोलनाने यंत्रणा कार्यान्वीत होवून यश मिळाल्याची भावना विलास लामखडे यांनी व्यक्त केली.
बाह्यवळण रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्याने दुरुस्तीचे काम रखडले होते. दीड ते दोन वर्षापासून निंबळक गटातील ग्रामस्थांचा या रस्त्यासाठी संघर्ष चालू होता. 

रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने अनेक लहान मोठे अपघात तर रात्री वाहन चालकांना लुटण्याचे प्रकार घडत आहे. निंबळक गटातील ग्रामस्थांची या रस्त्यावरुन नियमीत रहदारी असल्याने जीव मुठीत धरुन त्यांना प्रवास करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी या रस्ता दुरुस्तीच्या मागणीला जोर दिला होता. तसेच संपुर्ण रस्ता धुळीने माखल्याने रस्त्यालगत असलेल्या शेतीच्या पीकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले. लवकरच रस्ता दुरुस्तीचे काम होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी 17 कोटी रुपये मंजूर असून, 9 सप्टेंबर पर्यंन्त निवीदा प्रक्रिया पुर्ण होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. विळदघाट ते वाळूंज चौफुला या 19 कि.मी. लांबीच्या रस्त्याची खडीकरण व डांबरीकरणाने दुरुस्ती होणार आहे. 

वेळोवेळी करण्यात आलेल्या आंदोलनात मारुती गारुडकर, अजय लामखडे, जगन्नाथ शिंदे, सुभाष कोरडे, ग्रा.पं. सदस्य बबन कदम, अशोक पवार, जालिंदर गोडसे, जगन्नाथ शिंदे, संजय गायकवाड, मुख्तार शेख, बाबा पगारे, राजू रोकडे, तौफिक पटेल, सिकंदर तांबोली, बाबा मेढे, महादेव बडे, अशोक शिंदे, समीर पटेल, किसन शिंदे, उमेश साठे आदिंसह निंबळक गटातील ग्रामस्थांचा सहभाग होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.