पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा होणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ मागील काॅग्रेस आघाडी सरकारने त्यांचा जन्म दिवस हा शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. हा पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा जयंतीदिन नारळी पोर्णिमाला तिथी प्रमाणे साजरा केला जातो. यावर्षी दि.७ ऑगस्ट २०१७ रोजी हा जयंती दिन आहे . महाराष्ट्र शासनाने हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

शेतकरी दिनाच्या निमित्ताने पद्मश्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे हा उद्देश ठेवताना शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा यासाठी विविध कृषी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सविभागाने घेतला असून याबाबतचे परिपत्रकही शासनाने ३ ऑगस्ट २०१७ रोजी निर्गमित केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.