नेवासा तालुक्यात ८ वर्षाच्या मुलाचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यातील वांजोळी येथे प्रशांत लक्ष्मण येळवंडे या आठ वर्षीय मुलाचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. ६) घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या आजाराने मृत्यू पावलेल्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. 

दोन महिन्यापुर्वी राज्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. आवटे यांच्या पथकाने भेट देत स्वाईन फ्ल्यूच्या आजाराबाबत जिल्हाची आकडेवारी मोठी असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली होती. तसेच विविध उपाययोजनांचा कार्यक्रम संबंधित विभागांना देण्यात आला होता.

मात्र तरीही या आजाराची लागण व मृत्यूच्या घटना घडत असल्याने आरोग्य यंत्रणेबाबत सवाल उपस्थित केले जात आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग वारंवार आरोग्य सुविधांबाबत सदस्यांकडून धारेवर धरला जात असताना उपाययोजनांची केवळ माहिती देणाऱ्या विभागास आता जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत आहे..

दरम्यान, येळवंडे कुटुबियांची सभापती सौ. सुनिताताई गडाख यांनी भेट घेवून सांत्वन केले. तसेच तालुका आरोग्य आधिकारी डॉ. कसबे व इतर डॉक्टरांना वांजोळी या ठिकाणी बोलावून त्वरित वांजोळी व परिसरात स्वाईन फ्ल्यूचा प्रसार होऊ नये यासाठी त्वरीत उपाययोजना करण्यात सांगितले व आजारास प्रतिबंध घालण्यासाठी गावोगाव जनजागृती करणे, तसेच जास्त दिवस सर्दी, पडसे, कणकण असल्यास त्वरीत तालुका आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सभापती सौ. गडाख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही फोनवर नेवासा तालुक्यातील स्वाईन फ्ल्यू आजाराविषयी माहीती देऊन लवकरात लवकर संपूर्ण तालुकाभर आजार पसरू नये यासाठी कार्यवाही करण्याचे सांगितले. तसेच नागरिकांनीही आजार होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घावी याविषयी प्रबोधन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.