जलयुक्त शिवार ही पाण्याचे स्रोत निर्माण करण्याची पहिली पायरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भविष्यात ग्रामीण भागात पावासाच्या पाण्याचे साठवण करून, पाण्याचे नविन स्त्रोत निर्माण करून त्याचे पिण्यासाठी व शेतीसाठी योग्य नियोजन करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी केले आहे.

नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथे आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या विशेष प्रयत्नातून जलयुक्त शिवार योजने अंतर्गत ४३ लाख रूपयांच्या ४ साखळी सिमेंट नाला बंधाऱ्यांचे भूमिपूजन शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या हस्ते संपन्न झाले.

आ. मुरकुटे पुढे म्हणाले, पाणी प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा घटक आहे. जलयुक्त शिवार योजना ही नवीन पाण्याचे स्रोत निर्माण करण्याची पहिली पायरी आहे. गोंडेगाव येथे होणाऱ्या ४३ लाखांच्या ४ साखळी बंधाऱ्यात एकूण ३४ घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. त्यामुळे या परिसरातील ११ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येवून शेतकऱ्यांना त्याचा कायमस्वरूपी लाभ होणार आहे. 

कार्यक्रमास ज्ञानेश्वर वाघुले, तुळशीराम तुपे, गायसमुंद्रे, गायकवाड, गेवराईचे सरपंच सोपान कर्डिले, बाळासाहेब कोरडे, रामभाऊ रोडगे, अण्णासाहेब वाघुले, दत्तात्रय शेजूळ, चंद्रकांत वाघुले, डॉ. मुकूंद हारदे, देवेंद्र काळे, रामचंद्र गंगावणे, श्रीधर ठोंबळ, संदीप वाघुले, कचरू सुसे, लहू मते, दीपक हारदे, बंडू शिंदे, पत्रकार संदीप नवले, लक्ष्मण घुले, बाबासाहेब रोडगे, पांडुरंग रोडगे, ज्ञानदेव पाडळे, दीपक भागवत आदींसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्याणराव शेजूळ यांनी केले. तर आभार रामभाऊ रोडगे यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.